Political News : सुनील तटकरे २-४ दिवसांत मोठा निर्णय घेणार, शिंदेसेनेच्या नेत्याचे खळबळजनक विधान

Raigad Political News : रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश. आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका करत आगामी निवडणुकांसाठी खुले आव्हान दिले.
raigad political news
raigad political newsAI image
Published On: 
Summary
  • माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नाराज पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.

  • तटकरे यांनी कार्यकर्त्यांना मोठे करण्याऐवजी अनेकांना पक्षाबाहेर काढल्याचा आरोप केला.

  • सुनील तटकरे काही वेगळा राजकीय निर्णय घेऊ शकतात, असे दळवी म्हणाले.

रायगडच्या माणगावमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून या कार्यक्रमात बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत ते राजकीय मोठा निर्णय घेऊ शकतात असे म्हटले. तसेच आगामी निवडणुका तटकरे यांच्या विरोधात लढवल्या जातील, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

माणगाव नगरपंचायतीतील माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे, पक्षात सुनील तटकरे यांचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या काही नेत्यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

raigad political news
Ladli Behna Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

माजी नगरसेवक संदीप खरगटे, दिलीप जाधव, जयंत बोरडे, रत्नाकर उभारे आणि माजी उपनगराध्यक्ष निलिमा मेहता यांच्यासह भाग्यश्री यादव यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या प्रवेशामुळे माणगावमधील शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या कार्यक्रमानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तटकरे येत्या दोन ते चार दिवसांत काही वेगळा राजकीय निर्णय घेऊ शकतात, असा दावा दळवींनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता तटकरे यांना पूर्वीसारखे महत्त्व दिले जात नसल्याचेही त्यांनी म्हटले.

raigad political news
Blood Sugar:  शुगर कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा उपाय! रात्री खोलीत 'ही' एक गोष्ट , रक्तातील साखर राहील एकदम नॉर्मल

अजित पवार यांना जाऊन नऊ महिने झाले असताना आता तटकरे यांच्याकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. मात्र, त्यांनी अशी वक्तव्ये करणे योग्य नसल्याचा टोला दळवींनी लगावला. तसेच, तटकरे यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी कार्यकर्त्यांना मोठे करण्याऐवजी अनेकांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला, असा आरोपही दळवींनी केला. आगामी काळात जनता त्यांना योग्य उत्तर देईल, असे ते म्हणाले.

raigad political news
El Nino : अल-निनोमुळे भारतासाठी धोक्याची घंटा! २०२७ मध्ये उष्णतेचा रेकॉर्ड मोडणार, WHO कडून ग्रेड-3 अलर्ट जारी

श्रीवर्धन मतदारसंघ हा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, सुनील तटकरे यांनी या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण केले. आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्याचा निर्धार दळवींनी व्यक्त केला. आगामी निवडणुका तटकरे यांच्या विरोधात लढवल्या जातील, असे खुले आव्हानही त्यांनी दिले. माणगावमधील या पक्षप्रवेशामुळे रायगडच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होणार का आणि सुनील तटकरे यांच्यासमोरील अडचणी वाढणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.