Maharashtra Politics : भाजपमध्ये हालचाली, अमित शाह येण्याआधी फडणवीसांकडून उमेदवारांची चाचपणी

Devendra Fadnavis News : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवाराची चाचपणी सुरु कऱण्यात आली आहे. अमित शाह विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक घेतली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam tv
Published On

Maharashtra Politics News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्याआधी महायुती आणि मविआकडून जागावाटपाच्या हालचाली वेगाने सुरु आहेत. महायुतीमधील जागावाटपाचा पेच काही केल्या कमी होईना. विदर्भातील जागावाटपात भाजपाचा मोठा वाटा असेल. त्यातच अमित शाह विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. त्याआधीच देवेंद्र फडणवीस उमेदवाराची चाचपणी करणार असल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विदर्भ दौऱ्यापूर्वी फडणवीस उमेदवारांची चाचपणी करणार आहेत. नागपूरातील तीन मतदारसंघातील दावेदारांसोबत आज देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याची समोर आलेय.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics : मुंबईवरुन मविआत तिढा, ठाकरे-काँग्रेसकडून एकाचवेळी ६ जागांवर दावा, NCP ची भूमिका काय?

देवेंद्र फडणवीस अॅक्शनमोडमध्ये, उमेदवारांची चाचपणी करणार -

नागपूर शहरातील तीन मतदारसंघ, त्याशिवाय इतर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्योसबतच्या बैठकीसाठी विद्यमान आमदार आणि दावेदारांना बोलवण्यात आले आहे. नागपूर पूर्व, नागपूर उत्तर आणि नागपूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचा आढावाही देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. यावेळी या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेद्वारांशी फडणवीस चर्चा करून त्यांची मतं जाणून घेणार असल्याची चर्चा आहे.

अमित शाह विदर्भाच्या दौऱ्यावर -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकर मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त आहे. नागपूर आणि छ. संभाजीनगर येथे ते दौरा करणार आहे. नागपूरला 23 तारखेला बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

लोकसभेला फटका, विधानसभेला काळजी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोअर कमिटीच्या बैठका घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाडा आणि विदर्भात बसला होता महायुतीला मोठा फटका बसला होता. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तिकीट मागणाऱ्यांमध्ये आजी माजी आमदार यांच्यामुळे पक्षाला नुकसान होऊ नये, बंडाळी होऊ नये, तसेच इच्छुक उमेदवारांच्या भावना जाणून घेणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com