Nevasa Vidhan Sabha Matadarsangh : भाजपला ताकदीचा पैलवान भेटेना! काय आहे नेवासा विधानसभा मतदारसंघाचं राजकीय गणित? वाचा एका क्लिकवर

Nevasa Vidhan Sabha Election 2024 Sharad Pawar Group Vs BJP : आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस होईल, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आपण नेवासा तालुक्याची राजकीय सद्यस्थिती काय आहे, हे पाहू या.
नेवासा तालुक्याची राजकीय सद्यस्थिती
Nevasa Vidhan Sabha MatadarsanghSaam Tv
Published On

मुंबई : नेवासा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार संघ म्हणून ओळखला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्यामुळे आपण एकदा नेवासा तालुक्याच्या राजकीय गणितावर नजर टाकू या. तालुक्याची राजकीय सद्यस्थिती पाहता सध्या महाविकास आघाडीकडून आमदार शंकरराव गडाख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर भाजपकडे उमेदवारीसाठी भक्कम नेतृत्व नसल्याचं दिसतंय. तालुक्याचा आर्थिक कणा भक्कम करण्यात मुळा सहकारी साखर कारखाना आणि मुळा एज्युकेशन सोसायटीचा मोठा वाटा आहे.

२००९ ते २०२४ पर्यंतच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विचार करता नेवासा तालुक्याची भूमिका महत्वाची राहिली असल्याची दिसते. तालुक्यामध्ये एकूण ७२ हजार मतदार (Maharashtra Politics) आहेत. नगरमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झालाय. तर महायतीतील घटक पक्षांचा विचार करता शिंदे गटाला नेवासा तालुक्यातीत अधिक मताधिक्य मिळालं होतं, त्यामुळे शिंदे गट देखील दावा करण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित किंवा स्थानिक संस्था यावर गडाख यांचं प्राबल्य असल्याचं पाहायला मिळतंय, तेव्हा आगामी निवडणुकीत महायुतीकडून नेमकं कोण रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सध्या काय परिस्थिती ?

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा तालुक्यात महायुती आणि महाविकास आघाडीची अटीतटीची लढत होणार हे नक्की आहे. सध्या नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख हे (Nevasa Vidhan Sabha Matadarsangh)आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. गडाख यांच्या नेतृत्वामुळे नेवाश्यामध्ये महाविकास आघाडीची बाजू भक्कम दिसत आहे. पण विरोधात असणार्‍या महायुतीत मात्र उमेदवारी मिळविण्यासाठी गटबाजी सुरू असल्याचं चित्र आहे. भाजप आणि अजित पवार गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळतेय.

भाजपने २०१४ मध्ये विद्यमान आमदार गडाख यांचा पराभव केला होता. परंतु सत्तेत असताना भाजपने नवीन नेतृत्व निर्माण करण्यावर भर दिला नाही. याचाच फटका त्यांना २०१९ च्या निवडणुकीत बसला अन् दारूण पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. भाजपकडून उमेदवारीसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाअध्यक्ष विठ्ठलराव लंघे स्पर्धेत (Assembly Election 2024) असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी भाजप कुरघोडीचं राजकारण करताना दिसच आहे. सहकारी संस्था, शैनेश्वर देवस्थान यांची चौकशी करून गडाख यांचं नेतृत्व कमजोर करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते अब्दुल शेख यांनी देखील नेवासा विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय. त्यामुळे भाजप नेमकं कुणाला रिंगणात उतरवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

नेवासा तालुक्याची राजकीय सद्यस्थिती
Shirdi Assembly Constituency: शिर्डीत यंदा कोण वाजवणार विजयाचा डंका? सध्या काय आहे राजकीय परिस्थिती, वाचा सविस्तर...

२०१९ ची विधानसभा निवडणूक

नेवासा विधानसभा मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. २०१९ मध्ये नेवासा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरूद्ध भाजप अशी चुरशीची लढत झाली (MVA Against Mahayuti) होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकरराव यशवंतराव गडाख १,१६,९४३ मतांनी विजयी झाले. तर भाजपचे बाळासाहेब उर्फ ​​दादासाहेब दामोधर मुरकुटे हे ३०.६६३ मतांनी पराभूत झाले होते. २०१९ ची विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजयाचा गुलाल उधळला होता. शंकरराव गायकवाड हे सध्या नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत.

२०१४ ची विधानसभा निवडणूक

नेवासा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजयाचा झंडा फडकवला होता. २०१४ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली होती. यावेळी मात्र भाजपने विजयाचा गुलाल उधळला होता. भाजपचे बाळासाहेब उर्फ ​​दादासाहेब दामोधर मुरकुटे ८४,५७० मतांनी विजयी झाले होते. तर राष्ट्रवादीचे गडाख शंकरराव यशवंतराव ४, ६५९ मतांनी पराभूत झाले होते. आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबर अखेरीस होण्याची शक्यता आहे. तेव्हा नेवासा मतदारसंघात गडाख आपली सत्ता कायम ठेवणार की भाजप विजयाचा गुलाल उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नेवासा तालुक्याची राजकीय सद्यस्थिती
Kopargaon Assembly constituency: कोपरगाव मतदारसंघात कोण फडकवणार विजयाची पताका? काळे-कोल्हेंच्या लढाईकडे साऱ्यांचं लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com