Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

NCP Leader Nitesh Karale Arrested: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितेश कराळे यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली. आक्षेपार्ह विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
NCP Leader Nitesh Karale ArrestedSaam Tv
Published On
  • राष्ट्रवादी नेते नितेश कराळे यांना पोलिसांकडून अटक

  • नितेश कराळे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे

  • वर्धा पोलिसांनी नितेश कराळे यांच्यविरोधात गुन्हा दाखल करत केली अटक

  • पोलिसांकडून नितेश कराळेंची चौकशी सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याला पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात वर्धा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश कराळे यांना वर्धा पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास अटक केली. एका समाजाबद्दल अपमानास्पद आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अजय शंकरराव डोंगरे यांनी पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर प्रकरणाला सुरुवात झाली. त्यांच्या तक्रारीवरून नितेश बाळकृष्ण कराळे यांच्याविरुद्ध वर्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

३१ जुलै २०२६ रोजी ‘आरक्षण हटाव’ विषयावरील संबंधित व्हिडिओ नितेश कराळे मास्तर यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या व्हिडिओमधील वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. संबंधित व्यक्तीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील लागू कलमांनुसार कारवाईची मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली होती. तक्रारदाराने तक्रारीसोबत व्हिडिओची लिंक आणि इतर पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले होते.

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics: काँग्रेसला हादरा! शिंदेसेनेच्या गळाला लागला मोठा मासा; शेकडो पदाधिकाऱ्यांसह 'धनुष्यबाण' घेणार हाती

या सर्व पुराव्यानंतर नितेश कराळे मास्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी नितेश कराळे यांना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, नितेश कराळे हे वर्धा येथील प्रसिद्ध प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, सोसल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि राजकीय नेते आहेत. कराळे मास्तर या नावाने ते प्रसिद्ध आहेत. वर्ध्यातील फिनिक्स अकॅडमीचे ते संचालक आहेत.

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Poltics : अजितदादा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, नाशिकमध्ये झळकले बॅनर्स; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com