

गेल्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत, पण सुप्रिया सुळेंनी ठामपणे भूमिका मांडत एकत्रीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र विलीनीकरणात येत असलेल्या अडचणींचा विचार करता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वेगळ्याच समीकरणाची चाचपणी केली जातेय. ही चाचपणी म्हणजे विलीनीकरणाऐवजी स्वतंत्र पक्ष म्हणून थेट सत्तेत जाता येईल का? या पर्यायावर चर्चा सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे.
आपला भाऊ गेला त्याच दिवशी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महायुतीमध्ये आपण स्वतंत्र पक्ष म्हणून जाऊ शकतो का याची चाचपणी सुरू झाल्याची माहिती समोर आलीय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास दोन्ही पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांच्या वतीने मांडण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या समस्येवर तोडगा काढत शरद पवार गट स्वतंत्र पक्ष म्हणून सत्तेत सामील होणार असल्याची चर्चा आहे.
जर स्वतंत्र घटकपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत गेला तर त्यांना केंद्रात महत्वाचं खातं आणि राज्यात देखील मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडून विलीनीकरण आम्हाला शक्य नसून आपण शरद पवारांच्या पक्षाला स्वतंत्र पक्ष म्हणून घेतल्यास आपल्याला अडचण नसल्याचंही कळवण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाला मान्यता नसल्याचे सांगण्यात आलंय. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्वतंत्र पक्ष म्हणून महायुतीत किंवा एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध नसेल, अशी भूमिका सुनेत्रा पवारांनी घेतलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.