Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Raigad Political News: रायगडमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शिंदेसेना आणि राष्ट्रवादीतील वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ
Raigad NCP Vs Shivsena Saam Tv
Published On: 
  • आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

  • राष्ट्रवादीच्या नेत्याला महेंद्र थोरवेंनी दिली धमकी

  • संतोष बैलमारे यांची खालापूर पोलिस ठाण्यात दाखल केली तक्रार

  • रायगडमध्ये शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटला

रायगडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. जिल्ह्यामध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद पेटण्याची शक्यता आहे. शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या खालापूर तालुक्यातील सावरोली येथे सुरू असलेल्या एल अँड टी कंपनीत स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या श्रेय वादावरून हे प्रकरण घडलं आहे. शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष बैलमारे यांच्यात श्रेय वादावरून चांगलीच जुंपली आहे. महेंद्र थोरवे यांनी आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बैलमारे यांनी केला आहे.

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ
Maharashtra Politics: सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी खरंच शिंदेसेनेत प्रवेश केला का? स्वत: सांगितले सत्य

आमदार थोरवेंनी बैलमारे यांना धमकी दिल्याने रायगडमध्ये पुन्हा शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आमदार थोरवे यांनी धमकी दिल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार देखील बैलमारे यांनी खालापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. एकीकडे कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेत दुमत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे अशातच आता आमदारांनी दिलेल्या धमकीवरून पोलिस कोणत्या प्रकारे तपास करत कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं राहिल .

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ
Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com