Maharashtra Politics: मुहूर्त ठरला! पौष संपताच राजन साळवी घेणार निर्णय, शिवसेना की भाजप?

Mla Rajan Salvi Latest News: राजन साळवी हे आज ठाकरे गटाचे साथ सोडत शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. पण आज राजन साळवी यांचा कुठलाही पक्षप्रवेश नसल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Politics: शिंदेंकडून ठाकरेंना मोठा धक्का, कोकणात भगदाड; राजन साळवींसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Mla Rajan Salvi Latest News Saam TV
Published On

अमोल कलये, रत्नागिरी

राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते राजन साळवी हे पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत.

नाराज असलेले राजन साळवी हे आज ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. पण आज राजन साळवी यांचा कुठलाही पक्षप्रवेश नसल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांचा आज कुठलाही पक्षप्रवेश होणार नाही. पौष महिना संपताच राजन साळवी पुढील राजकीय भवितव्याबाबत निर्णय घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवी काय निर्णय घेणार? याबाबत कोकणात चर्चा सुरू आहे. राजन साळवी पक्षासोबत कायम राहणार? पक्षाला रामराम करणार? याचा अंतिम निर्णय पौष महिना संपल्यानंतर कळणार आहे.

Maharashtra Politics: शिंदेंकडून ठाकरेंना मोठा धक्का, कोकणात भगदाड; राजन साळवींसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra politics : राष्ट्रवादी-शिवसेना वाद विकोपाला, रायगडमधील दिग्गजांमध्ये तू तू मैं मैं, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

राजन साळवींनी पुढील निर्णय लवकर घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव आहे. उद्धव ठाकरे सेनेच्या कालच्या मुंबईतल्या मेळाव्याला देखील राजन साळवी यांनी दांडी मारली होती. त्यामुळे राजन साळवी नाराज असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या शिंदेच्या शिवसेनेकडे देखील वाढता कल आहे. अशामध्ये आता राजन साळवी नक्की काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. 'प्रत्येक पक्ष मजबूत कसा होतो हे पाहतो. मी आता माझ्या मतदारसंघात जातोय.', असे राजन साळवी यांनी सांगितले.

Maharashtra Politics: शिंदेंकडून ठाकरेंना मोठा धक्का, कोकणात भगदाड; राजन साळवींसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics: असली कोण, नकली कोण हे दाखवून दिलंय, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com