Maharashtra politics : राष्ट्रवादी-शिवसेना वाद विकोपाला, रायगडमधील दिग्गजांमध्ये तू तू मैं मैं, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

Shiv Sena vs NCP : रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद विकोपाला जाण्याच्या मार्गावर आहे. दिग्गज नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. रोह्यामध्ये गोगावले आणि महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवर टीकास्त्र सोडले.
Shiv Sena vs NCP
Shiv Sena vs NCP
Published On

सचिन कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

Raigad News : राज्यात सत्तेत असलेल्या आणि महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी हा वाद विकोपाला जाण्याच्या मार्गावर चालला आहे. आपापल्या मतदार संघातील सभा पत्रकार परिषदांमधून तटकरे यांना आव्हान देणाऱ्या मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी गुरुवारी चक्क तटकरे यांच्या होमग्राऊंड असलेल्या रोह्यात जाऊन खडे बोल सुनावले आहेत. (Shiv Sena and NCP Leaders Clash in Raigad)

रोह्यातील क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनाला मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे रोहा येथे उपस्थित होते. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि सेनेच्या दोन्ही आमदारांनी तटकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. आम्ही मेहनत घेतली म्हणून राज्यात राष्ट्रवादीची लाज राखली हे विसरू नका असा टोला लोकसभेच्या एकमेक विजयावरून मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे यांना लगावला.

सुनील तटकरे यांना औरंगजेबाची (Bharat Gogawale and Mahendra Dalvi criticize Sunil Tatkare, Raigad political dispute)

आमदार दळवी यांनी आता बुजुर्ग लोकांनी आपले दुकान बंद करावे असा सल्ला तटकरे यांना दिला. त्याशिवाय आता बस झाले नाहीतर जनताच धडा शिकवेल. तुमची मक्तेदारी राहिलेली नाही. ती संपली अशी बोचरी टिका केली. आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देत बेइमान बादशाह म्हणून उल्लेख केला. शिवसेना नेत्यांच्या टीकेवर राष्टावादी काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही, पण दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेल्याचं दिसतेय.

Shiv Sena vs NCP
CET Exam : सेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, अभ्यासाला एक महिन्याचा वेळ मिळणार

शिवसेनेच्या या लोकप्रतिनिधींना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर ज्यांनी निराधार आरोप केले, त्यांचं पुढं काय झालं हे सर्वांनी पाहिले आहे, असा सूचक इशाराच तटकरे यांनी दिला आहे. दरम्यान, महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना राष्ट्रवादीमधील हा वाद मिटणार की असाचा धुमसत रहाणार हे पहाण महत्वाच ठरणार आहे.

Shiv Sena vs NCP
Pune : पुणेकरांनो काळजी घ्या, मेंदू व्हायरसचा प्रभाव झपाट्याने वाढतोय, रूग्णसंख्या ६७ वर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com