Laxman Hake On Manoj Jarange: जरांगेची माघार, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; शरद पवारांचे नाव घेत साधला निशाणा

Laxman Hake Criticized Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याच्या निर्णयावर ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे.
Laxman Hake On Manoj Jarange: जरांगेची माघार, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; शरद पवारांचे नाव घेत साधला निशाणा
Laxman Hake Criticized Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या या निर्णयावर ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया देत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'बारामतीच्या स्क्रिप्टप्रमाणे जरांगे पाटील बोलतात. बारामतीतून जरांगेना आदेश गेला असावा म्हणून जरांगेंनी निवडणुकीतून पळ काढला.', असे वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केले आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या नावाचा देखील उल्लेख केला.

लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, 'मी नेहमी सांगत आलो होतो की ते निवडणूक लढणार नाहीत किंवा सामोरे जाणार नाहीत. बारामतीच्या स्क्रिप्टनुसार ते वागत आहेत. जत्रा भरवणं सोप असतं लढणं अवघड असतं. जरांगे पाटील यांना गनिमी काव्याशिवाय पर्याय नाही. रणांगणामध्ये लढायला वाघाचे काळीज लागते. लोकसभेला बारामतीच्या सांगण्यावरून त्यांनी प्रचार केला.'

तसंच, 'आज ओबीसी एकवटला त्यामुळे त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातून त्यांनी माघार घेतली आहे. रणांगणांवर लढायला वाघाचं काळीज लागतं. गनिमी काव्याचा काळ गेला. दिवसाला भूमिका बदलणारा हा माणूस आहे. मुंबईला मोर्चा घेऊन गेले आणि मुंबईच्या वेशीवरून ते माघारी आले. जरांगे नावाच्या माणसाला संविधान, लोकशाही आणि निवडणुकीचा अभ्यास नाही.', असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केले.

Laxman Hake On Manoj Jarange: जरांगेची माघार, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; शरद पवारांचे नाव घेत साधला निशाणा
Maharashtra Politics : तासगावात प्रत्येक घरात ३ हजार रुपयांचं वाटप? संजयकाका पाटलांचा रोहित पाटलांवर गंभीर आरोप,VIDEO

त्याचसोबत, 'जत्रा भरवण्यासारख्या निवडणुका असतात का?', असा सवाल उपस्थित करत लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, 'ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी पाठींबा दिला आहे ते आता काम करणार नाही. ज्यांनी जरांगेंना पाठींबा दिला त्यांचा कार्यक्रम ओबीसीच करणार. ज्यांनी जरांगेंना पत्र दिले, त्यांना भेटले त्यांचा ओबीसी कार्यक्रम करणार.', असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

दरम्यान, 'ओबीसीचा समाजाचा वापर करून निवडून आले. आमचे पण काही ओबीसी उमेदवार आहे. अनेक ठिकाणचे उमेदवार निवडून येणार आहे. १० ते १२ मतदारसंघात आमचे उमेदवार आहेत. काही मतदारसंघात अनेक अर्ज ओबीसीचे आहेत. मराठवाड्यातील ७-८ जिल्ह्यातील कामं आम्ही करत आहोत. ओबीसी ७० जागा लढणार काही ३०-३५ ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार आहोत. शरद पवार यांच्या उमेदवाराला पाठींबा असेल पण त्यांना ओबीसीबाबत भूमिका घेणार असेल त्यांना पाठिंबा देणार, लेखी देणार असेल आणि विरोधात असेल त्याचा विरोध असेल. जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूला असेल त्यांना आमचा पाठींबा असेल.', असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले.

Laxman Hake On Manoj Jarange: जरांगेची माघार, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; शरद पवारांचे नाव घेत साधला निशाणा
Maharashtra Politics : पाडवे दोन, भाऊबीज एक? बारामतीत पवार कुटुंबीयांचे पहिल्यांदाच दिसले २ पाडवे, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com