Sharad Pawar : मी अस्वस्थ... अजित पवार यांच्या दिवाळी पाडव्यावर शरद पवार काय म्हणाले?

Sharad Pawar vs Ajit Pawar : अजित पवार यांच्या वेगळ्या पाडव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSaamTv
Published On

Pawar Family Diwali Padwa in Baramati: बारामतीत पहिल्यांदाच पवारांचे २ पाडवा मेळावे झाले. गोविंद बागेत शरद पवार आणि काटेवाडीत अजितदादांचा पाडवा मेळावा पार पडला. शरद पवार यांच्या पाडवा मेळाव्याला अनेकांनी हजेरी लावली होती. पाडवा मेळावा झाल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या पाडवा मेळ्यावर भाष्य केले. अनेक वर्षांपासूनची पाडवा मेळाव्याची परंपरा कायम राहायला हवी होती, असा खेद शरद पवार यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले शरद पवार ?

बारामतीमध्ये दोन पाडवा व्हायला नको अशी लोकांची भावना आहे. पाडव्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. पाडवा या ठिकाणी साजरा केला जातो. या प्रांगणात आम्ही सर्वजण जमतो, ही जुनी पद्धत आहे. ही कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. पण आता ठीक आहे. लोकांना डबल ठिकाणी जावं लागलं. त्यांना त्रास झाला. त्यामुळे मी अस्वस्थ आहे, असे शरद पवार म्हणाले.

राजेंद्र पवार काय म्हणाले ?

अजित पवार यांनी वेगळा पाडवा आयोजित केला आहे हे मला आज सकाळीच कळलं एकाच कुटुंबातील सदस्यांनी असे दोन वेगवेगळे पाडवे करायला नको होते ते चुकीचा आहे, असे राजेंद्र पवार म्हणाले.

रोहित पवार काय म्हणाले ?

अजित पवारांकडे दिवाळी पाडव्यासाठी आलेली गर्दी म्हणजे सर्व लाभार्थी आहेत. तिथे आलेल्या गाड्या तुम्ही पाहा एक एक कोटीच्या गाड्या आहेत, शरद पवारांकडे आलेले लोक हे सर्व सामान्य लोक आहेत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. ⁠घर फुटण्याचं अजित पवार यांना जर आज दुःख होत असेल तर याची सुरुवात कोणी केली. याची सुरुवात लोकसभेला त्यांनीच केली. युगेंद्र पवार यांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. सुप्रिया सुळे यांचे त्यांनी काम केलं ते काम पाहूनच पवार साहेबांनी त्यांना बारामतीमधून विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com