Prajakt Tanpure: अखेर प्राजक्त तनपुरे यांचं ठरलं! भाजपमध्ये करणार प्रवेश; फेसबुक प्रोफाईलही बदलला

Prajakt Tanpure To Join BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते प्राजक्त तनपुरे ३० मे रोजी भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. त्या आधी तनपुरे यांनी आपला फेसबुक प्रोफाइलमधील बदलला आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Prajakt Tanpure: अखेर प्राजक्त तनपुरे यांचं ठरलं! भाजपमध्ये करणार प्रवेश; फेसबुक प्रोफाईलही बदलला
Published On
Summary
  • प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरू.

  • ३० मे रोजी भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त.

  • तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे असून राष्ट्रवादीतील मोठे नेते मानले जातात.

राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री असलेल्या प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. तनपुरे ३० मे रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतली होती. तेव्हापासून ते भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरू होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. तनपुरेंच्या भाजप प्रवेशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र तो मोठा धक्का बसणार आहे. (Former NCP Minister Prajakt Tanpure Likely to Enter BJP on May 30)

Prajakt Tanpure: अखेर प्राजक्त तनपुरे यांचं ठरलं! भाजपमध्ये करणार प्रवेश; फेसबुक प्रोफाईलही बदलला
सर्वात मोठी बातमी! १०० नगरसेवकांचा राजीनामा; राज्यातील राजकारणात खळबळ,TMCमध्ये अंतर्गत वाद उफाळला

प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच अहिल्या नगरमधील ते मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना विधान परिषदेतून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

फेसबुक प्रोफाईल बदलला

प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे फेसबुक प्रोफाईल बदलला आहे. त्यांनी फेसबूक डीपीमध्ये जयंत पाटलांचा फोटो लावला आहे. त्यामुळे एक प्रकारचा हा भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगरमध्ये भाजपची ताकद वाढेल.

Prajakt Tanpure: अखेर प्राजक्त तनपुरे यांचं ठरलं! भाजपमध्ये करणार प्रवेश; फेसबुक प्रोफाईलही बदलला
Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेसचे २३ नगरसेवक नॉट रिचेबल; राजकीय वर्तुळात खळबळ

पक्षात तनपुरे नाराज

दरम्यान राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू झाली होती. माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले, तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. मात्र दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चाललंय, याचे दुःख आहे, अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली होती.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आला होता. पण मला निष्ठा, तत्व याच्याशी प्रामाणिक राहावू वाटलं. पण सध्याचे राजकारण म्हणजे जो तत्वाशी जोडला राहील त्याचे राजकारण संपतंय. याउलट जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती असल्याचं बोलत प्राजक्त तनपुरे यांनी नाराजी बोलून दाखवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com