Political News : भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत उबाठाच्या आमदाराचे नाव

Maharashtra Political News : धाराशिव भाजपमध्ये बसवराज पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा चर्चेत. कार्यक्रमाच्या पत्रिकेत पाटील दाम्पत्याचे नाव नसल्याने राजकीय चर्चांना उधाण.
Maharashtra Political News
Maharashtra Political News Saam Tv
Published On
Summary
  • धाराशिव भाजपमधील राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत

  • पक्षाच्या कार्यक्रमात पक्षातील नेत्याचे निमंत्रणपत्रिकेत नावे गायब

  • भाजपच्या कर्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत उबाठाच्या आमदाराचे नाव

  • ‘पाटील विरुद्ध पाटील’ची चर्चा

धाराशिव जिल्ह्यातील भाजपाच्या दोन नेत्यांमधील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील आणि तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातील राजकीय मतभेदांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या अंतर्गत संघर्षाला पुन्हा तोंड फुटल्याचे चित्र दिसत आहे.

आमदार बसवराज पाटील यांच्या पुढाकाराने मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच त्यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या बॅनरवरही पाटील दाम्पत्याचे फोटो नसल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political News
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

दुसरीकडे, याच कार्यक्रमाच्या बॅनर आणि निमंत्रणपत्रिकेत उबाठाचे आमदार प्रवीण स्वामी यांचे नाव असल्याने हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. भाजप नेत्याच्या कार्यक्रमात पत्रिकेवर पक्षातील नेत्याचे नाव न टाकता दुसऱ्या पक्षातील नेत्याचे नाव असल्याने कार्यकर्त्यांमध्येही कुजबुज सुरू झाल्याचे चित्र आहे.

Maharashtra Political News
Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका लहान मुलांमध्ये का वाढतोय? 'या' ६ कारणांकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर...

धाराशिवच्या राजकारणात राणाजगजितसिंह पाटील हे भाजपचे प्रमुख नेते असून, बसवराज पाटील यांनीही अलीकडच्या काळात भाजपमध्ये आपले स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निमंत्रणपत्रिकेवरील नाव किंवा बॅनरवरील फोटो यावरूनच अंतर्गत संघर्षाचा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसले, तरी अलीकडच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या घटनेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे धाराशिव भाजपमध्ये ‘पाटील विरुद्ध पाटील’ असा सामना खरोखरच आकार घेत आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com