

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
एकनाथ शिंदे गुजरात दौऱ्यावर आहेत
वडनगरहून अहमदाबादला रस्ते मार्गाने रवाना
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरात दौऱ्यावर ते हेलिकॉप्टरने जाणार होते. पण टेकऑफ घेण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे रस्ते मार्गाने अहमदाबादकडे रवाना झाले. वडनगर येथे एकनाथ शिंदेंनी हेलिपॅडवर ४५ मिनिटं हेलिकॉप्टरची वाट पाहिली. शेवटी ते रस्ते मार्गाने वडनगरवरून अहमदाबादकडे रवाना झाले. गुजरात दौऱ्यावरून ते परत येताना चार्टर्ड विमानाने येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.