

सुशिल थोरात, प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आमदार निलेश लंके यांचा बालेकिल्ला असलेल्या पारनेरमध्ये अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत बोलताना अजित पवार यांनी लोकांचे काम व्हावे, हीच इच्छा असल्याचे सांगत निलेश लंकेंना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.., असे प्रतिपादन केले.
काय म्हणाले अजित पवार?
"पारनेर (Parner) माझे आजोळ असल्याने मला या जिल्ह्याची माहिती आहे. काही भागत दुष्काळी परिस्थतीमुळे नेहमीच शेतकरी अडचणीत असतो. उजनी धरण साठ टक्के भरले, कुकडी निळवंडे मुळा अशी धरणे भरले, तर पाण्याचा प्रश्न मिटतो.. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी देवीला साकडे घालू..." असे अजित पवार यावेळी म्हणाले.
सत्तेसाठी हपापलो नाही..
यावेळी पुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी, "माझ्या वेगवेगळ्या भागातील लोकांची कामे होणे गरजेचे आहे. निलेश लंके जेव्हा मागायला येईल, तेव्हा पंधराशे कोटी रुपयांची कामे झालेली आहे आम्ही सत्तेला हपापलेलो नाही सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नाही," असेही अजित पवार यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी हा टोला नेमका कोणाला लगावला? याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आमदार निलेश लंकेंचे केले कौतुक...
पारनेरच्या या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले. "निलेश लंके हा अत्यंत जागृत प्रतिनिधी आहे. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने काम केले. दिवसरात्र एक करुन त्याने काम केले. त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे, अशा शब्दात अजित पवारांनी निलेश लंकेंचे केले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.