CM On Parbhani Violence: सोमनाथ सूर्यवंशीसोबत कोठडीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

Somnath Suryavanshi Death: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत परभणी हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यंवंशी यांच्या मृत्यूबाबत निवेदन दिले. याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
CM On Parbhani Violence: सोमनाथ सूर्यवंशीसोबत कोठडीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला
CM On Parbhani ViolenceSaam Tv
Published On

परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर परभणीमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचाराची घटना घडली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी (३५ वर्षे) या तरुणाचा कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधक देखील याप्रकरणावरून आक्रमक झाले आहेत.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत परभणी हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यंवंशी यांच्या मृत्यूबाबत निवेदन दिले. सोमनाथ सूर्यवंशीसोबत कोठडीमध्ये नेमकं काय घडलं होतं. याचा संपूर्ण घटनाक्रम देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर केली.

CM On Parbhani Violence: सोमनाथ सूर्यवंशीसोबत कोठडीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला
Beed News : बीड सरपंच हत्या प्रकरण; कराड यांच्याबद्दल धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले... |VIDEO

मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी सांगितले की, 'सोमनाथ सूर्यवंशी हे एक आंदोलक होते. ते वकिलीचे शिक्षण घेत होते. ज्यावेळी परभणीमध्ये जाळपोळ सुरु होती त्या घटनेचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला होता. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील समावेश होता.'

CM On Parbhani Violence: सोमनाथ सूर्यवंशीसोबत कोठडीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला
Parbhani Protest: परभणी हिंसाचार प्रकरण, ३५० जणांविरोधात गुन्हा, व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद; आज कशी आहे परिस्थिती?

अटकेनंतर सोमनाथ सूर्यवंशी यांना दोन वेळा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं होतं. मॅजिस्ट्रेटने लिहिलेल्या ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आहे. दोनवेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारलं होतं की, तुम्हाला थर्ड डिग्री वापरली का? पोलिसांनी तुम्हाला मारले होते का? तर ते नाही म्हणाले होते. ते पोलिस कोठडीमध्ये असतानाचे फुटेज उपलब्ध आहे. त्यात काहीच एडिट केलेले नाही. फुटेजमध्ये त्यांना कुठलीही मारहाण झालेली दिसत नाही.'

CM On Parbhani Violence: सोमनाथ सूर्यवंशीसोबत कोठडीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला
Parbhani Update : परभणी बंदला हिंसक वळण, काय म्हणाले प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले

'सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा आजार होता. त्यांच्या शरीरावर जुन्या जखमा होत्या. पोलिस कोठडीतून एमसीआरमध्ये गेले तेव्हा जेलमध्ये असताना सकाळच्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सहकैद्याने तक्रार केली होती की सोमनाथ यांना त्रास होत आहे. त्यांना लगेच रुग्णालयात नेलं तिथे त्यांना मृत घोषित केले गेले. याप्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी हे आरोपी असले तरी ते गरीब कुटुंबातील होते. ते वडार समाजाचे होते. पैशाने कोणाचा जीव परत येत नाही. पण त्यांच्या कुटुंबीयांना सरकार १० लाखांची मदत देईल. याप्रकरणी पोलिस निरीक्षक यांना निलंबित केले असून याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल.'

CM On Parbhani Violence: सोमनाथ सूर्यवंशीसोबत कोठडीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला
Parbhani News : परभणी का पेटलं? कडकडीत बंद असताना नेमकं काय घडलं?|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com