Maharashtra Politics: इकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, तिकडे मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंच्या आमदाराला 'प्रपोजल'; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

CM Fadnavis Proposal To Thackeray MLA : महाराष्ट्रात 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू आहे. त्याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांना 'प्रस्ताव' दिल्याचं विधान केलंय. यामुळे नवीन राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
CM Fadnavis  Proposal To  Thackeray MLA
CM FADNAVIS’ ‘PROPOSAL’ TO THACKERAY MLA SPARKS OPERATION TIGER BUZZ IN MAHARASHTRASaam Tv
Published On
Summary
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबाजी काळेंना ‘प्रपोजल’ दिल्याचं वक्तव्य केलं.

  • हे वक्तव्य भीमाशंकर येथील धार्मिक कार्यक्रमात करण्यात आलं.

  • राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना यामुळे आणखी उधाण आलं.

रोहिदास गडगे,साम प्रतिनिधी

श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार बाबाजी काळेंना आम्ही प्रपोजल दिलंय असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. आधीच राज्याती राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, त्यात मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या आमदाराबाबत केलेल्या विधानामुळे खळबळ उडवून दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्रीक्षेत्र भिमाशंकर मंदिराच्या नव्या सभामंडपाचे काम चालू आहे. हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभामंडपावरील मुकुटाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. यावेळी दीपमाळेचेही पूजन झाले. याच कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी हे ठाकरेंच्या आमदाराला प्रपोजल दिलंय.

CM Fadnavis  Proposal To  Thackeray MLA
भाजपचं टेन्शन वाढणार, २८ खासदार असलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह येथील उपक्रमास पुणे जिल्ह्यातील अनेक बडे नेते उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील ठाकरेंचे एकमेव आमदार बाबाजी काळे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

CM Fadnavis  Proposal To  Thackeray MLA
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा 'खेला होबे'; आणखी एका खासदाराने सोडली साथ, ७ दिवसात तिसरा राजीनामा

कार्यक्रमादरम्यान वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना बाबाजी काळेंसोबत छायाचित्र काढण्याची विनंती केली. त्यावर फडणवीसांनी मिश्कील शैलीत, “फोटोची गरज नाही… बाबाजींना आम्ही एक प्रपोजल दिलं आहे,” असे वक्तव्य केले. मात्र प्रपोजल नेमकं कशाचं, याबाबत त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही.

विशेष म्हणजे बाबाजी काळे हे उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या या वक्तव्याला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. हे प्रपोजल केवळ मिश्कील टिप्पणी होती की त्यामागे काही मोठं राजकीय गणित दडलं आहे, याबाबत आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा जो तो आपल्या परीने राजकीय अर्थ लावत आहे. बाबाजी काळे हे उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्याला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठकही बोलावली आहे. त्यातच, फडणवीसांच्या विधानाने अनेकांची भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com