Nana Patole News: लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसचं वजन वाढलं! विधानसभेच्या १५० जागा लढवणार; नाना पटोलेंची घोषणा

Maharashtra Politics Breaking News: अववघा एक खासदार म्हणून हिणवल्या गेलेल्या काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील यांच्यासह १४ खासदार निवडून आणल्याची किमया केली आहे. लोकसभेतील या मोठ्या विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने विधानसभेची तयारी केली.
Nana Patole News: लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसचं वजन वाढलं! विधानसभेच्या १५० जागा लढवणार; नाना पटोलेंची घोषणा
Nana Patole NewsSaam tv

मुंबई. ता. ६ जून २०२४

राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश संपादन करत सर्वात मोठा पक्ष होण्याची किमया केली. अवघा एक खासदार म्हणून हिणवल्या गेलेल्या काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील यांच्यासह १४ खासदार निवडून आणल्याची किमया केली आहे. लोकसभेतील या मोठ्या विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने विधानसभेची तयारी केली असून याबाबतची सर्वात मोठी घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

काय म्हणाले नाना पटोले?

लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारी करावी लागेल. आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष १५० जागा लढवण्याच्या विचारात आहे. लोकसभेत जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी साडे तीन महिने गेले. विधानसभेत हे टाळावे लागेल. त्यासाठी महिन्याभरात जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करावा लागेल. म्हणूनच आत्तापासूनच तयारी करावी लागेल, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटीलही आमच्यासोबत येतील. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मोठा फायदा झाला. या यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले. आम्ही हाच उत्साह घेऊन विधानसभेच्या मैदानात उतरु, असे नाना पटोले म्हणाले.

Nana Patole News: लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसचं वजन वाढलं! विधानसभेच्या १५० जागा लढवणार; नाना पटोलेंची घोषणा
Yavatmal Crime News: पैशाच्या वादातून भयंकर कांड.. भररस्त्यात चाकूने वार करत तरुणाची हत्या; यवतमाळ हादरलं

तसेच लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फॅक्टरचा प्रभाव नव्हता. तसेच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचाही फारसा प्रभाव जाणवला नाही. गेल्या निवडणुकीत आम्ही वंचितमुळे ९ जागा हरलो होतो. मात्र या निवडणुकीत त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. असा दावाही यावेळी नाना पटोले यांनी केला.

Nana Patole News: लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसचं वजन वाढलं! विधानसभेच्या १५० जागा लढवणार; नाना पटोलेंची घोषणा
Mumbai News: खळबळजनक! विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबई विमानतळावरील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com