मतदानाआधीच राज्यातला पहिलाच नगराध्यक्ष बिनविरोध, धुळे जिल्ह्यात भाजपचं खातं उघडलं

BJP Unopposed Victory In Dondaicha Varwade Municipal Election: धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी झाला आहे. नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड झाली असून, या विजयानं भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
NAYNAKUVAR RAWAL ELECTED UNOPPOSED: BJP CLAIMS FIRST MAYORAL WIN IN DHULE DISTRICT
NAYNAKUVAR RAWAL ELECTED UNOPPOSED: BJP CLAIMS FIRST MAYORAL WIN IN DHULE DISTRICTSaam Tv
Published On

धुळे: दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलथापालथ झाली असून भाजपच्या उमेदवार नयनकुवर रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्या राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री असून भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार होत्या.यासोबतच भाजपचे आणखी सात नगरसेवकही बिनविरोध निवडून आल्याने दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहेत.

NAYNAKUVAR RAWAL ELECTED UNOPPOSED: BJP CLAIMS FIRST MAYORAL WIN IN DHULE DISTRICT
Maharashtra Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, बड्या नेत्याने हाती घेतलं 'कमळ'

या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांवर महानगरपालिकेचा कर थकवल्याचा आरोप करत भाजपकडून त्यांच्या उमेदवारीवर हरकत घेण्यात आली होती. त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुपारी पाच वाजण्याची वेळ दिली होती.

NAYNAKUVAR RAWAL ELECTED UNOPPOSED: BJP CLAIMS FIRST MAYORAL WIN IN DHULE DISTRICT
भाजपात इनकमिंगचा धडाका! कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला धक्का; बड्या नेत्यांची कमळाला साथ

हरकतीनंतर शरयू भावसार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली, मात्र निकाल हा भाजपपक्षाच्या बाजूने लागला, आणि नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड झाली.या राजकीय घडामोडींमुळे दोंडाईचा नगरपरिषदेवर भाजपने निर्विवाद पकड निर्माण केली असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

NAYNAKUVAR RAWAL ELECTED UNOPPOSED: BJP CLAIMS FIRST MAYORAL WIN IN DHULE DISTRICT
Mahayuti Dispute: कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचा पारा चढला,नाराज शिंदेंच्या मंत्र्यांना झापलं

भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट हे मित्रपक्ष राज्यात महायुती म्हणून सत्तेत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठिब मात्र युती झालेली नाहीये. यामुळे महायुतीतील मित्र असलेल्या जवळपास या सर्व पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री रावल यांनी रणनीती आखत आपले वर्चस्व कायम ठेवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com