भाजपात इनकमिंगचा धडाका! कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला धक्का; बड्या नेत्यांची कमळाला साथ

BJP strengthens position in kalyan dombivli: डोंबिवलीतील अनमोल म्हात्रे, महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील यांच्यासह अनेक जणांचा भाजपामध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत.
BJP political News
BJP political NewsSaam
Published On
Summary
  • भाजप पक्षात इनकमिंग सुरू

  • विविध पक्षातील नेत्यांची कमळाला साथ

  • कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला धक्का

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगरपरिषद तसेच नगरपंचायत या दोन्ही निवडणुका डिसेंबरच्या सुरूवातीला पार पडतील. अशातच भाजप पक्षात इनकमिंगचा धडाका सुरू आहे. विविध पक्षातील माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ दिली आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

डोंबिवलीचे माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे तसेच माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे यांच्यासह कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.

याप्रसंगी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल माजी अध्यक्ष समीर चिटणीस, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक राहूल दामले, मंदार हळबे, जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP political News
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती, २ बड्या नेत्यांची भाजपमध्ये एन्ट्री

यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत माझे मित्र आणि हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित असलेले महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, संजय विचारे यांनी पक्षात प्रवेश केला.

या भागातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम्ही वर्षानुवर्षे एका मित्रत्वाच्या नात्याने अतिशय ताकदीने एकत्र काम करत होतो. मविआ सरकारच्या काळात या कार्यकर्त्यांना त्याकाळात त्रास देण्याचा प्रयत्न झाला. आगामी काळात विकासाची दृष्टी ठेवून काम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मित्र म्हणून जर सगळे एकत्र राहिलो तर चांगल्या पद्धतीने काम पुढे नेता येईल असे वाटते', असे चव्हाण यांनी सांगितले.

BJP political News
'भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..' शहाजी बापू पाटील संतापले, नेमकं काय म्हणाले?

अनमोल म्हात्रे यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यात अश्विनी म्हात्रे, शिवसेनेचे युवा विभाग प्रमुख गजानन जोशी, विभाग अध्यक्ष ओमकार सुर्वे, माधुरी साळुंके, सुषमा सावंत, अलका कोलते, सविताताई शेलार, लक्ष्मीताई रानभरे, श्रध्दा माने यांचा समावेश आहे.

महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यात अण्णा राणे, संजय विचारे, शाखा प्रमुख सरिता शर्मा, विभाग प्रमुख संगीता अंबरे, उपविभाग प्रमुख आरती चव्हाण, अलका कुळे, छाया कांबळे, उप विभाग प्रमुख ऋषिकेश देशमुख, विभाग प्रमुख दीपक पारेख, शाखा प्रमुख वसंत सुखदरे, सुनील पाटील, संदीप तेमुरे आदींचा समावेश आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com