Maharashtra Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, बड्या नेत्याने हाती घेतलं 'कमळ'

Advay Hire Joins BJP: नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेतलं.
Maharashtra Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, बड्या नेत्याने हाती घेतलं 'कमळ'
CM Devendra Fadnavis Saam Tv
Published On

Summary -

  • नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का

  • शिवसेना ठाकरेगटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली

  • अद्वय हिरे आणि त्यांच्या समर्थकांसह भाजप झेंडा हाती घेतला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधूमध्ये नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नाशिमध्ये भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला. नाशिकमधील ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. याचदरम्यान नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेचे अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. अद्वय हिरे हे गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. अखेर त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अद्वय हिरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे शिवसेनेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, बड्या नेत्याने हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics: शिंदेंच्या शिवसेनेचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार; नाराज मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला|VIDEO

अद्वय हिरे यांच्यासोबत अपूर्व हिरे, प्रसाद हिरे आणि तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. अद्वय हिरे हे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक होते. आता ते भाजपमध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये अद्वय हिरे यांनी दादा भुसे यांना कडवे आव्हान दिले होते. दरम्यान, येत्या २ डिसेंबर रोजी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढल्यामुळे महायुतीला याचा चांगला फायदा होईल.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, बड्या नेत्याने हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics : मराठवाड्यात सगे-सोयऱ्यांचे वर्चस्व, आमदारांची - मंत्र्यांची मुले-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com