लोकसभा तसेच विधानसभा निवडणूका जवळ आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. तसेच आगामी निवडणूकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली असून मोठ- मोठे पक्षप्रवेश सोहळे पार पडताना दिसत आहेत. अशातच उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
उल्हासनगरचे भाजपा (BJP) नगरसेवक राजेश वानखेडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात प्रवेश केला. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. उद्धव ठाकरे यांनी राजेश वानखेडे यांना शिवबंधन बांधून पक्षामध्ये स्वागत केले. आगामी लोकसभेची तयारी सुरू असतानाच वानखेडे यांनी पक्ष सोडल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजेश वानखेडे( Rajesh Wankhede) यांनी अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपतर्फे (BJP) उमेदवारी घेऊन राजेश वानखेडे यांचा अल्पमताने पराभव झाला होता.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अभिनेते किरण मानेही ठाकरेंच्या शिवसेनेत...
दरम्यान, लोकप्रिय मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनीही आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. राजकारण गढूळ झालं असताना एकटा माणूस लढतोय. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून त्यांचा सोबत येण्याचा निर्णय घेतल्याचे किरण माने म्हणाले. तसेच संविधान वाचवण्यासाठी मी पक्षा मार्फत काम करीन, असेही किरण माने म्हणाले. (latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.