राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी रोहित पवार बच्चा आहे, असा टोला लगावला होता.
त्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही बच्चा है पर मन का सच्चा आहे.. असे म्हणत दादांवर पलटवार केला होता. काका- पुतण्यांच्या या वादात आता अजित पवार गटाच्या नेत्या मंत्री अदिती तटकरे यांनी उडी घेतली असून त्यांनी थेट रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्यात अदिती तटकरे?
"आपला पहिल्या टर्मचे आमदार म्हणून अनुभव किती आहे. आपण टीका कोणावर करतो? याचे भान ठेवणे गरजेचे आहे. दादांनी किती काम केले आहे. हे सगळ्यांनी पाहिले आहे. राजकीय मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत. असा टोला महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना लगावला
तसेच यावेळी बोलताना अदिती तटकरे (Aditi Takare) यांनी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चांवरुनही प्रतिक्रिया दिली. "आमची पाच वर्ष तर राजकीय भूकंप पाहण्यातच गेली. त्यामुळे आता कोणता राजकीय भूकंप होणार हे सांगू शकत नाही..." असे त्या म्हणाल्या.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"महायुतीचे सरकार आल्यानंतर मार्च 2023 मध्येच राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना वाढ केलेली आहे अंगणवाड्यांचे मूळ अंगणवाडी मध्ये रूपांतर करण्यात आले आहे मदतनिसांची अंगणवाडी सेविकांमध्ये पदोन्नती होणार आहे. नवीन 13 हजार मदतनीसांच्या जागा तयार झाल्या आहेत..." अशी माहितीही अदिती तटकरे यांनी दिली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.