Mallikarjun kharge: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किती जागांवर निवडणूक लढणार? मल्लिकार्जुन खरगे म्हणाले...

Mallikarjun kharge News: इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच लोकसभेच्या जागावाटप, पदाविषयी अंतिम निर्णय घेऊ, असं वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं आहे.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge Saam Tv
Published On

Congress mallikarjun kharge:

आगामी लोकसभा निवडणुकीचे सत्ताधारी आणि विरोधकांना वेध लागले आहे. विरोधी पक्षांच्या 'इंडिया आघाडी'नेही आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. काँग्रेसकडूनही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरु झाली आहे. याचदरम्यान, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच लोकसभेच्या जागावाटप, पदाविषयी अंतिम निर्णय घेऊ, असं वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, काँग्रेसने सर्व ५४५ लोकसभा मतदारसंघात काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाने सर्व मतदारसंघात समन्वयक नियुक्त केले आहेत. परंतु कोणत्या मतदारसंघात कोणता पक्ष निवडणूक लढेल, कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार, याबाबत इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्र चर्चा करून निर्णय घेतील'.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mallikarjun Kharge
Kalyan Lok Sabha Seat: श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा, कल्याण लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा

काँग्रेस पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार, या प्रश्नाला उत्तर देताना खरगे म्हणाले, आम्ही सर्व लोकसभा मतदारसंघात समन्वयकांची नियुक्ती केली आहे. आम्ही सर्व लोकसभा मतदारसंघात जाऊन चाचपणी करू. इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व राज्यातील लोकसभा जागांवर चर्चा होईल. त्यानंतर आकडे समोर येतील. परंतु आमचे सर्व जागांवर प्रयत्न सुरु आहेत. इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये लोकसभा जागावाटपावरून मतभेद झाल्यास आमचे मतदारसंघातील समन्वयक हस्तक्षेप करतील'.

Mallikarjun Kharge
Sanjay Singh: आप नेते संजय सिंह तुरुंगातून बाहेर येणार, या कामासाठी मिळाली परवानगी

' इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर आम्ही १०-१५ दिवसांत आघाडीच्या पदाविषयी निर्णय घेऊ. सर्व मुद्द्यांवर एकत्रित येऊन काम केलं जात आहे. लोकसभेच्या जागावाटपासाठी काँग्रेसने आधीच एक समिती गठीत केली आहे. या समितीतील सदस्य त्यांचं काम करत आहे. या समितीत समन्वयक मुकुल वासनिक , अशोक गहलोत आणि भूपेश बघेल यांच्या सामावेश आहे, असे खरगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com