सोलापूरमध्ये (Solapur Stone Planting) हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकी प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या मोर्चा सभेत चितावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश आणि आमदार टी. राजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा आणि लव्ह जिहाद कायदा अमलात आणावा यामागणीसाठी सोलापूरमध्ये (Solapur) हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा दरम्यान मधला मारुती चौकात दोन गटात दगडफेक झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली. या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
या मोर्चा सभेत तेढ निर्माण करणारे, चितावनीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि आमदार टी. राजा (T. Raja) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांसह सकल हिंदू समाज समन्वयक सुधीर बहिरवडे आणि मंचावर उपस्थित 8 ते 10 पदाधिकाऱ्यांवर सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारतीय दंड संहिता विधेयक कलम 153(अ),295(अ),188,34 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मोर्चाआधीच आमदार नितेश राणे आणि आमदार टी राजा सिंग यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. धार्मिक तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याबाबात ही नोटीस होती. त्यानुसार आता त्यांची भाषण तपासून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.