मोठी बातमी! महायुतीतील बंडखोर माजी आमदाराचा उमेदवारी अर्ज बाद

MLC Election: विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार आणि महायुतीचे बंडखोर विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलाय. बाजोरिया यांनी राजकीय कटाचा आरोप केला असून न्यायालयात जाण्याची योजना आखली आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election
Former MLA and Mahayuti rebel Viplav Bajoria suffered a major setbacksaam tv
Published On
Summary
  • माजी आमदार आणि महायुतीचे बंडखोर नेते विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद

  • हर्षजीत देशमुख यांनी अर्जावर आक्षेप घेतला होता.

  • अर्ज बाद झाल्यानंतर बाजोरिया यांनी राजकीय कटकारस्थानाचा गंभीर आरोप केला.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याचदरम्यान अमरावतीमधील मोठी बातमी हाती आली आहे. माजी आमदार विप्लव बाजोरिया याचा उमेदवारी अर्ज बाद झाला. माजी आमदार विप्लव बाजोरिया हे महायुतीचे बंडखोरी केली होती. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Maharashtra Vidhan Parishad Election
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिर्डीतील खासदार शिंदे गटात जाणार? चर्चांना उधाण

महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. नामांकन अर्ज बाद झाल्यानंतर बायोरिया यांनी प्रतिक्रिया देताना गंभीर आरोप केला आहे. आमचा नामांकन अर्ज बाद व्हावा यासाठी चार उमेदवार एकत्र येऊन कट कारस्थान रचले असल्याचा आरोप करत या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती दिली आहे.

अमरावतीच्या जागेसाठी आता चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख, महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा आणि प्रशांत महल्ले या चार उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कायम आहेत. दरम्यान पोटे यांना महायुतीतील भाजपसह राष्ट्रवादी व शिवसेनेचे समर्थन असल्याने पालकमंत्र्यांनी युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा व भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची नाराजी दूर केल्याची चर्चा आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election
विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; तीन नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे

या पक्षाचेही समर्थन राहणार असल्याचा दावा करीत पोटे यांचाच विजय होणार असल्याचेही सांगितलं जात आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी या मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवलाय. नगरपरिषद व महापालिकेतील भाजपचे संख्याबळ मोठे आहे. याशिवाय मित्रपक्ष राष्ट्रवादी, शिवसेनेसह युवा स्वाभिमानचे सदस्य धरून एकहाती विजय मिळवण्याचा भाजपचा दावा आहे.

दरम्यान विप्लव बाजोरिया यांनी उमेदवारी दाखल केल्याने महायुतीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता त्यांचा अर्ज बाद झाला आहे. दरम्यान काँग्रेसने स्थानिक पातळीवरील उमेदवार न देता यावेळी नागपूर येथील व्यावसायिक हर्षजित देशमुख यांना मैदानात आणले आहे. मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेले हर्षजित देशमुख नवखे असले तरी काँग्रेसची दमदार फळी त्यांच्यासोबत आहे.

काँग्रेसला सोलापूरात धक्का

सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला आहे. काँग्रेसने आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज आता बाद झाला आहे. काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचे अर्ज पडताळणीत स्पष्ट झाले. त्यामुळेच फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेलसा मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com