

भाऊसाहेब वाकचौरे यांना अप्रत्यक्षपणे पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला
अहिल्यानगरमधील ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याला वाकचौरे अनुपस्थित
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा
सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी
राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळतेय. याचदरम्यान ठाकरे गट शिवसेनेने शिर्डीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला.मात्र या मेळाव्यात विद्यमान ठाकरे सेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची अनुपस्थितीत होते, त्यामुळे त्यांची अनुपस्थितीची चर्चा जोरदार झाली, भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान त्यातच संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वाकचौरे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याने वाकचौरे खरंच ठाकरेंची साथ सोडणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय. पक्षाच्या मेळाव्याला गैरहजर राहणाऱ्या खासदाराला माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी सुनावलंदेखील. खासदार भाऊसाहेब वाकचौरे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यातच त्यांच्या अनुपस्थिती असल्याने चंद्रकांत खैरे यांनी भाषणातून त्यांना वेगळे न वागण्याचा सल्ला दिला. मेळाव्याला आज खासदार दिसत नाहीत.
कदाचित कुठे गावाला गेले असतील. यापूर्वी देखील असे एकदा झालं होतं. त्यावेळी मी दोघा नवरा बायकोला दिल्लीला बोलावून चर्चा केली होती. त्यावेळी त्यांना तिकीट देण्यात माझा सर्वात मोठा वाटा होता, असे चंद्रकांत खैरे म्हणाले. त्यावेळी तुम्ही गेले, मात्र त्यानंतर उद्धव साहेबांनी तुम्हाला माफ केले. आता आज तुम्ही पुन्हा सेनेचे खासदार झाला आहात. मात्र ते कार्यकर्त्यांना भेटत नाही अशा तक्रारी येत आहेत. त्यांच्या अपरोक्ष हा मेळावा आज घेतल्याबद्दल अभिनंदन.
ते आजही अधिकृतपणे कुठे गेले नाहीत अस मला वाटतं, त्यांनी जाऊ नये ही माझी विनंती, बाकी त्यांची मर्जी, असे म्हणत चंदक्रांत खैरेंनी वाकचौरेंवर भाष्य केलं. ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना अंबादास दानवे कार्यकर्त्यांना अधिक जोमाने लढण्याचे आवाहन केले. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी, महाराष्ट्र धर्म, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी जोमाने लढण्याचे आवाहन अंबादास दानवे यांनी केले.
काही दिवसापूर्वी ठाकरे सेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. दरम्यान राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चांनी जोर धरला होता. त्याचदरम्यान वाकचौरे यांनी उदय सामंत यांची भेट घेतली होती. वाकचौरे यांनी शिर्डीतील एमआयडीसीच्या कामानिमित्ताने सामंताची भेट घेतल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं. मात्र शिर्डीत पक्षाचा मेळावा असताना स्वत: खासदार अनुस्थित असल्यानं वेगळ्याच चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.