Beed: बीडमध्ये राष्ट्रवादीकडून पैसे वाटल्याचा आरोप, दुचाकीच्या डिक्कीत सापडले पैसे; VIDEO व्हायरल
Beed NCP Cash Distribution VideoSaam Tv

Beed: बीडमध्ये राष्ट्रवादीकडून पैसे वाटल्याचा आरोप, दुचाकीच्या डिक्कीत सापडले पैसे; VIDEO व्हायरल

Beed NCP Cash Distribution Video: बीडमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पैसे वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन तरुणांना दुचाकीसह पकडण्यात आले. त्यांच्याकडे पैसे सापडले.
Published on

Summary -

  • बीडमध्ये राष्ट्रवादीकडून पैसे वाटल्याचा आरोप

  • पेठ बीड भागात दोन तरुण पैसे वाटत असल्याचा आरोप

  • दुचाकीच्या डिक्कीत रोख रक्कम आणि राष्ट्रवादीचे पोस्टर आढळून आले

  • व्हिडिओ सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होतोय

बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. बीड शहरातील पेठ बीड भागात रात्री पैसे वाटप करत असल्याचा दोन तरुणांवर आरोप करण्यात आला आहे. या तरुणांना पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. या तरुणांच्या दुचाकीच्या डिक्कीत पैसे आढळून आले. या दुचाकीवर एका विशिष्ट पक्षाचे पोस्टर लावले होते. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

बीडमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानाच्या आदल्या रात्री दुचाकी घेऊन पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत दोन व्यक्तींना बीड शहरातील पेठ बीड भागातील सोनार गल्लीत काही तरुणांनी पकडले. त्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. स्कुटीच्या डिक्कीत काही रक्कम आणि राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह असलेले काही पोस्टर देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

Beed: बीडमध्ये राष्ट्रवादीकडून पैसे वाटल्याचा आरोप, दुचाकीच्या डिक्कीत सापडले पैसे; VIDEO व्हायरल
Maharashtra Politics : अजित पवार पुढच्या काळात मुख्यमंत्री असतील; मिटकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

तरुणांना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र 'आम्हाला कुठल्याही प्रकारची रक्कम आढळलेली नाही. रात्री आम्ही केवळ काही जणांकडून चाकू ताब्यात घेतले आहेत.', अशी माहिती पेठ बीड पोलिस ठाण्याचे प्रमुख खेडकर यांनी फोनवरून बोलताना दिली आहे. मात्र व्हिडिओमध्ये ५०० रुपयांच्या काही नोटा देखील दिसत आहेत. तर डिक्कीमध्ये चाकू असल्याचं कोणीतरी बोलत असल्याचे व्हिडीओत ऐकू येत आहे.

Beed: बीडमध्ये राष्ट्रवादीकडून पैसे वाटल्याचा आरोप, दुचाकीच्या डिक्कीत सापडले पैसे; VIDEO व्हायरल
Maharashtra Politics: काय डोंगर, काय झाडी, आता शहाजीबापूंवर धाडी,भाजपनं आवळला शिंदेसेनेभोवतीचा फास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com