Manasvi Choudhary
हिवाळ्याच्या सुट्टीत अनेकजण बाहेर फिरायला जातात. ख्रिसमसच्या सुट्टीत लोक फिरायचे प्लान करतात. तुम्हाला बीडमध्ये फिरायचे असेल तर आम्ही काही प्रसिद्ध ठिकाणे सांगणार आहोत.
बीड जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी होते.
बीड शहरात कंकालेश्वर मंदिर आहे. जलकुंडात असलेलं हे मंदिर पर्यटकांसाठी आकर्षणाचे क्रेंदबिंदू ठरलं आहे.
बीड शहराचा जुना इतिहास आहे. या ठिकाणी असलेलं खंडोबा मंदिर इतिहासाची साक्ष देते.
बीड येथील खंडोबा मंदिराच्या समोर भव्य अशी सत्तर फुटी दीपमाळ आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच दीपमाळ आहे.
बीड शहरापासून ५ ते ७ किलोमीटरच्या अंतरावर खजाना विहीर आहे. साधारण तीनशे वर्षापेक्षा अधिक कालावधी ही विहिर खोदली आहे.
बीड जिह्यातील परळी वैजनाथ येथून ३५ कि.मी अंतरावर अंबेजोगाई योगेश्वरी मंदिर आहे.