Ajit Pawar NCP News: राष्ट्रवादीत घडामोडींना वेग! सुनिल तटकरे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष; अजित पवारांकडून नियुक्ती

Ajit Pawar News: आम्ही पक्षासोबत आहोत आणि पक्षाच्या चिन्हावरच इथून पुढच्या निवडणुका लढवू, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली होती.
Ajit Pawar
Ajit Pawarsaam tv
Published On: 

Maharashtra Political News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्याकडून आमच्यासोबतच संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला आहे. तर शरद पवार यांनी पुन्हा पक्षाची मोर्चेबांधणी करण्याची घोषणा केली आहे.

आम्ही पक्षासोबत आहोत आणि पक्षाच्या चिन्हावरच इथून पुढच्या निवडणुका लढवू, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार त्यांच्या गटाच्या नवीन प्रदेशाध्यक्षांचे नाव घोषीत करणार असल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar
Buldhana News: कमी उंचीवरून गेले हेलिकॉप्टर; कर्कश आवाजात बिथरल्‍याने बैल गंभीर जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार हे अधिकृत पत्र काढून त्याबाबत घोषणा करतील, असं सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ९ आमदारांवर अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. तसेच या बंडानंतर पक्षातील राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहेत. या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट देखील पक्षाकडून जागीर करण्यात आला आहे. 

Ajit Pawar
Sharad Pawar News : शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेत फिरवली भाकरी, इतिहासात प्रथमच...

अमोल कोल्हे शरद पवारांसोबत..

दरम्यान, या संपूर्ण नाट्यमय घडामोडी घडत असताना अजित पवार यांना पहिला धक्का मिळाला आहे. काल अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी बाप विसरायचा नाही म्हणत... मी साहेबांसोबत असल्याचे जाहीर केले आहे. ट्वीट करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com