Satara News: आशिया खंडात सर्वांत माेठी समजली जाणा-या रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी माजी सनदी अधिकारी विकास देशमुख (Vikas Deshmukh) यांची आज (साेमवार) साता-यात नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar Latest News) यांच्या अध्यक्षतेखाली साता-यात झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी आजपर्यंत संस्थेमधील प्राचार्य यांची निवड केली जात असे. यंदा प्रथमच संस्थेच्या कार्याध्यक्षपदी नऊ मे दिवशी माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांची आणि आज माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांची सचिवपदी निवड ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी सनदी अधिका-यांना संस्थेचे पदाधिकारी हाेण्याची संधी प्राप्त झाली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या (rayat shikshan sanstha) संघटकपदी डाॅ. अऩिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या काल झालेल्या मॅनेजींग काैन्सिल बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. डाॅ. पाटील हे संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू आहेत. त्यांनी संस्थेत कार्याध्यक्षपदी भूषविले आहे. संस्थेच्या एकूण गुणवत्ता वाढीत त्यांचा माेलाचा वाटा आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.