Sharad Pawar News: गुरुपाेर्णिमेच्या (guru purnima 2023) पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar In Karad) यांनी आज (साेमवार) कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती समाधी स्थळास (yashwantrao chavan samadhi karad) अभिवादन करीत पुन्हा एकदा एक नवा राजकीय अंक सुरु केला. एनसीपीला फाेडणा-या प्रवृत्तांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने दिला. (Maharashtra News)
साता-यात जाेरदार स्वागत
राष्ट्रवादीत रविवारी घडलेल्या बंडानंतर शरद पवार यांनी हे माझ्यासाठी नवे नसल्याचे म्हटलं. त्यांनंतर त्यांनी उद्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळास अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचे जाहीर केले. त्यानूसार आज ते कराड येथे आले हाेते. त्यावेळी त्यांची पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील भेट घेतली. त्यांचे सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी जाेरदार स्वागत करण्यात आले.
साता-याची बहुमाेल साथ
शरद पवार यांनी आजपर्यंत अनेक चढ उतार पाहिले आहेत. संघर्षाची वेळ आली की त्यावर मात करण्यासाठी ते नेहमी सातारा जिल्ह्यापासून सुरुवात करतात. सातारा जिल्ह्याने देखील त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आजपर्यंत बहुमाेल साथ दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला मानला जाताे.
साथीदार गेले तरीही...
पवार यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण असल्याचे नेहमी सांगितले जाते. त्यांना राजकारणाचे बाळकडू हे यशवंतराव चव्हाणांकडून मिळाले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारीसाठी यशवंतराव चव्हाण यांनी ताकद दिली. सन १९७८ मध्ये काँग्रेस पक्ष फूटला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण व शरद पवार हे दाेघे बरोबर होते.
त्यानंतर पवार यांनी त्यांची राजकीय वाटचाल सुरु ठेवली. त्यात सातारा जिल्ह्याने त्यांना साथ दिली. सन १९८० साली शरद पवार यांना ५० साथीदार सोडून गेले. त्यांच्यासह सहा आमदारच राहिले होते. त्यात सातारा जिल्ह्यातील माणमधील विष्णुपंत सोनावणे हे एकच आमदार सोबत राहिले. चिमणराव कदम, शंकरराव जगताप, प्रतापराव भोसले, धोंडिराम कदम, पी. डी. पाटील, विलासराव पाटील-उंडाळकर असे सर्व इंदिरा गांधींच्या काँग्रेसमध्ये गेले.
सगळं संपलं असं वाटत असतानाच...
शरद पवार यांची सातारा जिल्ह्यातील राजकीय कारकिर्द संपली असे वाटत असतानाच नंतरच्या निवडणुकीत विष्णुपंत सोनवणे, विक्रमसिंह पाटणकर व श्याम अष्टेकर हे 3 आमदार शरद पवार यांच्या विचाराचे निवडून आले. तेव्हापासून सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्याबराेबर आजतागायत राहिला.
पावसाच्या सभेने वारं फिरलं
राष्ट्रवादीच्या निर्मीतीनंतर सातारा जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था या शरद पवार यांच्या विचारांच्या झाल्या. गेल्या निवडणुकीतही जिल्ह्यातील व राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्याशी फारकत घेतली परंतु साताऱ्यात मुसळधार पावसात शरद पवारांनी सभा गाजवली. या सभेने राज्यातील निवडणुकीचा निकाल बदलला असेही जाहीरपणे अनेक राजकीय लाेक सांगतात.
नवा राजकीय अंक सुरु
शरद पवार यांची सातारा जिल्ह्याशी घट्ट नाते असल्याचे वेऴाेवेऴी सिद्ध झाले आहे. अजित पवार (ajit pawar) यांच्या बंडानंतर आजही शरद पवार प्रीतिसंगमावरून बाेलत असताना त्यांची देहबाेली बरेच काही बाेलून गेली. त्यामुळे सातारा जिल्ह्यातून पुन्हा एकदा शरद पवार यांनी त्यांचा सुरु केलेला नवा राजकीय अंक त्यांच्या पक्षाला बळ देणार ठरेल असं मानले जात आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.