खासदारांनंतर आता 50 नगरसेवक शिंदेसेनेत जाणार? बड्या नेत्याच्या दाव्यानं उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय देशमुख यांनी केलेल्या दाव्यामुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलंय. एकनाथ शिंदे पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra Politics:
MAHARASHTRA POLITICS: AFTER MPS, WILL 50 CORPORATORS JOIN SHINDE SENA? CLAIM RAISES UDDHAV THACKERAY'S TENSIONsaam tv
Published On
Summary
  • आता ५० नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • खासदार संजय देशमुख यांच्या वक्तव्यामुळे 'ऑपरेशन टायगर २.०'ची चर्चा सुरू

  • या घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंसमोरील राजकीय आव्हाने वाढण्याची शक्यता

ठाकरे गटातील सहा खासदारांनी सोमवारी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानं एकनाथ शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' यशस्वीरीत्या पार पडल्याची चर्चा आहे. खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर रायगड जिल्ह्यातील ठाकरे सेनेचे श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्ष अतुल चोगले हे शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. तर आता ठाकरे गटातील ५० नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याचा दावा शिवसेनेतील खासदाराने केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलंय.

Maharashtra Politics:
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनंतर एमआयएमला मोठा धक्का; BMCमधील नगरसेवकाचं पद रद्द, कारण काय?

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंकडून पुन्हा ऑपरेशन राबवलं जाणार असल्याची चर्चा होतेय. त्यात नगरसेवकांना फोडलं जाणार असल्याचा दावा केला जातोय. ठाकरे सेनेतील नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असून तेही लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा केला जातोय. ठाकरे गटातील बंडखोर खासदार संजय देशमुख यांनी दावा केलाय की, वाशिम आणि यवतमाळ येथील ५० नगरसेवकांनी आपल्याशी संपर्क केला असून त्यांनी शिंदे गटात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Maharashtra Politics:
Explainer: 'Operation Tiger' पूर्ण, आता पुढे काय? श्रीकांत शिंदेंकडून नव्या ऑपरेशनचे संकेत,ठाकरे नेत्यांची गळती रोखू शकतील?

माध्यमांशी बोलताना संजय देशमुख म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संजय राऊतांचा दावा यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी फेटाळून लावलाय. सहा खासदार हे 85 कोटी रुपये आणि त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव होता, त्यामुळे ते सत्ताधारी गोटात सामील झालेत असा दावा संजय राऊत यांनी केला होता. परंतु आपण निधीअभावी मतदारसंघातील अनेक प्रकल्प थांबले असल्यानं सत्तेत सहभागी झालो आहोत, असं देशमुख म्हणालेत.

50 नगरसेवक शिंदे गटात येणार - संजय देशमुख यांचा दावा

एनडीएला सध्या खासदारांची गरज नाही. त्यांच्याकडे संख्याबळ आहे. आम्ही विकासकामांसाठी त्यांच्यासोबत सामील झालो आहोत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील झाल्यानंतर वाशिम आणि यवतमाल येथील 50 नगरसेवकांनी माझ्याशी संपर्क साधलाय. त्यांनी पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. ईडी-सीबीआयच्या दबावाचा प्रश्नच उद्भवत नाही. "आमच्याकडे तशा प्रकारची मालमत्ता नाहीये" असे संजय देशमुख म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com