Maharashtra Politics : बदलापूरवरून राजकारण तापलं, मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांना पोटशूळ, ठाकरे म्हणतात मुख्यमंत्री विकृत

Badlapur Case: लाडकी बहिण योजनेमुळे पोटशूळ उठल्यामुळेच विरोधकांनी बदलापूरचं आंदोलन केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यानी केला. त्यामुळे संतप्त उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर थेट विकृत मानसिकतेची टीका केली.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam Tv
Published On

तन्मय टील्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

बदलापूरमधल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय. लाडकी बहिण योजनेमुळे पोटशूळ उठल्यामुळेच विरोधकांनी बदलापूरचं आंदोलन केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यानी केला. त्यामुळे संतप्त उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर थेट विकृत मानसिकतेची टीका केली. याच वादावरचा हा रिपोर्ट.........

बदलापूरमधल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय..या प्रकरणाचं विरोधक राजकारण करतायत...अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती. याचा चांगलाच समाचार उद्धव ठाकरेंनी घेतलाय. बदलापुरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर ते विकृत आहेत असा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही शाब्दीक फटकारे लगावले.

बदलापुरच्या आंदोलकांचा उद्रेक झाला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत होते असा आरोप उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. पोलीसांवर कोणाचा दबाव होता हे समजले पाहीजे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लक्ष्य केलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निष्क्रीय असल्याची टीकाही त्यांनी केली. आणि त्यामुळेच या उद्रेकाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
MPSC Exam : MPSC परीक्षा लांबणीवर, आंदोलकांची धरपकड, विद्यार्थ्यांचं एकच मिशन, नोटीफिकेशन

बदलापूर प्रकरण चिघळण्याला शाळेचा निष्काळजीपणा आणि पोलिसांची दिरंगाई कारणीभूत आहे यात शंका नाही. मात्र यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळाला तर सरकार बॅकफूटवर गेलं. आता 24 ऑगस्टला मविआचा महाराष्ट्र बंद आहे...त्यामुळे अजून काही दिवस बदलापूरवरून राजकारणाचा धूर निघत राहणार यात शंका नाही.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Bad Sleeping Time Side Effects : चुकीच्या वेळी झोपाल तर कायमचे झोपाल? अवेळी झोपण्यामुळे हार्ट अटॅकचा धोका?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com