Maharashtra Politics: शिंदेची मोठी खेळी! ३ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी 'धनुष्यबाण' घेतला हाती

Big Political Development in Koregaon: साताऱ्यातील कोरेगावमध्ये शिंदेंनी मोठी खेळी केली. आमदार महेश शिंदे यांना मोठा धक्का बसला. महेश शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश केला.
Maharashtra Politics: शिंदेची मोठी खेळी! ३ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी 'धनुष्यबाण' घेतला हाती
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On: 

ओंकार कदम, सातारा

साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली. आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आकाश साबळे आणि पैलवान सचिन शेलार यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला. माजी नगरसेवक दीपक फडतरे यांनीही यावेळी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या घडामोडीमुळे कोरेगावच्या स्थानिक राजकारणात आमदार महेश शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोरेगावच्या स्थानिक राजकारणात या पक्षप्रवेशामुळे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय असलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदेसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्या गटाला हा मोठा धक्का असल्याची चर्चा होत आहे.

Maharashtra Politics: शिंदेची मोठी खेळी! ३ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी 'धनुष्यबाण' घेतला हाती
Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांची मोठी खेळी, भाजप अन् शिंदेसेनेला झटका; १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं घड्याळ

यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी कोरेगाव येथील शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांच्या पाठीशी आपण भावासारखे खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोणतेही पद न मागता जनतेच्या कामांसाठी धडपडणाऱ्या राजाभाऊंना कोरेगावकरांनी भक्कम साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. तसेच, आगामी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डावॉर्डात संघटन मजबूत करून नगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

Maharashtra Politics: शिंदेची मोठी खेळी! ३ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी 'धनुष्यबाण' घेतला हाती
Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी, ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? विश्वासू नेत्याने घेतली शिंदेसेनेच्या मंत्र्याची भेट

आगामी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. वॉर्डावॉर्डात संघटन मजबूत करा आणि नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी कार्यकर्त्यांना केले. या पक्षप्रवेशामुळे कोरेगावमधील शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता असून आगामी नगरपंचायत निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics: शिंदेची मोठी खेळी! ३ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी 'धनुष्यबाण' घेतला हाती
Politics: मोठी बातमी! NDA ची ताकद वाढली, ४ मोठे पक्ष सहभागी; संख्याबळ ४२ खासदारांनी वाढले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.