शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शिंदेसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगरचे संकेत दिले होते. तेव्हापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मोठी खेळी करणार असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच ठाकरेंचे विश्वासू नेते भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांची भेट घेत चर्चा केली होती. या भेटीनंतर आता ठाकरेंच्या आणखी एका विश्वासू शिलेदाराने उदय सामंत यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी बुधवारी दुपारी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. मंत्रालयामध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली. उदय सामंत आणि बाबाजी काळे यांच्यात राजकिय चर्चा झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती दिली. या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली असून त्यांच्या भेटीचे फोटो देखील समोर आले आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदेंचे ॲापरेशन टायगर सक्रिय झाल्याची चर्चा होऊ लागली आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर देखील ऑपरेशन टायगरवर चर्चा झाली होती. त्याचसोबत भास्कर जाधव शिंदेसेनेत जाणार असल्याची देखील चर्चा झाली होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, 'उदय सामंत मंत्री आहेत. ते काही एका पक्षाचे मंत्री नाहीत. त्यांना कुणीही भेटू शकतं. आम्हीही अनेक मंत्र्यांना भेटतो. भेट झाली म्हणजे ऑपरेशन टायगर आहे असं काही नसतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.