महाराष्ट्रात मान्सूनने हजेरी लागली असली तरी राज्यात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. याविषयी सरकारशी चर्चा करणार आहे. मात्र जमीन कसायची सोडू नका, तुमची जमीन कसण्यासाठी नरेंद्र मोदी येणार नाहीत, असा मिश्किल टोला लगावत काहीही करून सरकार बदलायचं आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज इंदापूरमधील शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
शरद पवारांचा दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेसाठी पवारांकडून दुबार पेरणीची सुरुवात करण्यात येत आहे. य़ावळे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, सरकारला अनुदान द्यावंच लागेल. नाही दिलं तर रस्त्यावर उतरावच लागेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी रस्त्यावर उतरायला तयार आहे. नाहीतर 4-५ महिने थांबा. कारण मला सरकार बदलायचे आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचे आहेत. त्यासाठी तुमची साथ हवी असं म्हणत त्यांनी लोकसभेला साथ दिल्याबद्दल आभार मानले.
22 गावांचा बारमाही पाण्याचा प्रश्न सोडवावा
नीरा नदीवर बंधारा उभा करण्याची गरज
चारा छावणी मंजूर करावी
दुधाचे अनुदान थकीत आहे, ते मिळावे
आम्ही दूध आणि डाळिंबाच्या पीकावर अवलंबून
दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जानेवारीमध्ये जाहीर केलंय, पण अद्याप मिळालेले नाही.
प्रत्यक्ष काय स्थिती आहे पाहावं म्हणून आलेलो आहे. पाऊस सुरू झाला आहे किती दिवस टिकेल,दुष्काळ घालवेल का हा प्रश्न आहे. नीरा नदीवरचा डावा कालवा खराब आहे. जे काही ठरलेले पाणी येत नाही. नदीच्या वरच्या भागातील लोक पाणी इकडे येऊ देतं नाहीत. ही कामं राज्य सरकारला सांगून करावी लागतील.निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे आता सरकार किती काम करेल माहिती नाही. पण आम्ही निर्णय घेतलेला आहे, काहीही झालं तरी सरकार आपल्या हातात घेण्याच ठरवलेलं असल्याचं ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.