Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना अल्झायमरचा आजार झालाय, PM मोदींवरील टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule News: मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण तुमच्या भ्रष्ट कारभारातून मुक्त करू - बावनकुळे
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule On Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Maharashtra Political News: बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टवर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आगामी निवडणुकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवारांवर देखील निशाणा साधला. मोदींवर केलेल्या टीकेनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचार झाला आहे, अशा शब्दांत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

पुढे ते म्हणाले की, साल २०१९ च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे मोदीजींवर केलेली भाषणं तुम्हाला आठवतील.

तुमची शिल्लक सेना जपून ठेवा

महायुतीच्या जागा वाटपावरुन गोंधळ असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यावर बावनकुळेंनी म्हटलं की, आमची चिंता तुम्ही करू नका, तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का? त्याकडे लक्ष द्या, असा इशारा बावनकुळेंनी दिलाय.

आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी ५ दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण २०२४ साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीच्या घरी बसण्याचं काम देणार आहे, अशी टीका बावनकुळेंनी आपल्या ट्वीटमधून केलीये.

मुंबई शिवसेनेपासून हिसकावली जातेय तसेच मुंबई मराठी माणसापासून तोडली जाणार असं पॉटकास्टमध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यावर ३० वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं, ते उद्धव ठाकरे आज मुंबईची चिंता करत आहेत. मुंबईवरील तुमचं बेगडी प्रेम ऊतू जात आहे. मुंबई तोडणार असं सांगून तुम्ही मुंबईकरांची दिशाभूल करत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण येत्या निवडणुकीत तुमच्या भ्रष्ट कारभारातून मात्र मुंबई नक्की मुक्त होईल, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना ललकारलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com