भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या नितेश राणे यांनी आता थेट पोलिसांच भर सभेत धमकी दिली. 'मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की बायकोला फोन देखील लागणार नाही.', अशा शब्दात रितेश राणे यांनी पोलिसांना दम भरला. सांगलीतील पलूस येथे शिवशक्ती-भिमशक्ती जन आक्रोश मोर्चा दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
लव्ह जिहादवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सांगलीमधून पोलिस अधिकाऱ्यांना भर सभेतून दम दिलाय. 'सरकार हिंदूचे आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की तुमच्या बायकांना देखील फोन लावता येणार नाही.',अशा भाषेत नितेश राणेंनी पोलिसांना धमकी दिली.
पलूस शहरामध्ये लव्ह जिहादविरोधात खासदार अमर साबळे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना नितेश राणेंनी पोलिसांवर निशाणा साधला. 'पोलिस ठाण्यात लव्ह जिहादबाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्धा तासांत घेतली पाहिजे.अन्यथा पुढच्या तीन तासांत पोलिस ठाण्यात दाखल होऊन गोंधळ घालू.' असा इशारा नितेश राणे यांनी पोलिसांना दिला आहे.
'लव्ह जिहादमध्ये मुलगी गेलेल्या बापाची भावना समजून घ्या. अशापद्धतीचे अश्रू परत माझ्या इथल्या हिंदू मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा दुप्पट अश्रू मी तुमच्या डोळ्यातून काढण्याची गॅरंटी देतो.', अशा शब्दात नितेश राणे यांनी पोलिसांना खडसावून सांगितले. 'मी गप्प बसणार नाही. आम्ही फक्त निवदेन देत नाही. आपला डायरेक्ट कार्यक्रम असतो. मी इकडे तिकडे बघणारा नाही. मी जिकडे जातो तिकडे तयारीने जातो. त्यामुळे कोणी माझ्या वाटेला जात नाही', असे देखील ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.