Maharashtra Politics : विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेसच्या अडचणी वाढणार? दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, पाहा VIDEO

Congress MLA Is Likely entry in Shinde Group : कॉंग्रेसचे दोन आमदार शिंदे गटात जाणार, अशी माहिती समोर येत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय. कॉंग्रेस आमदार हिरामन खोस्कर, जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचं समोर आलंय. काल १३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर ही भेट झाली असल्याची माहिती मिळतच आहे. या आमदारांच्या भेटीचे फोटो साम टीव्हीच्या हाती लागलेले आहेत.

विशेष म्हणजे, विधान परिषद निवडणुकीत या आमदारांवर क्रॉस वोटिंग केल्याचा देखील आरोप केला होता. त्यामुळे आता हे दोन आमदार कॉंग्रेसची साथ सोडून शिंदे गटामध्ये जाणार का? हा प्रश्न निर्माण होतोय. अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगु लागल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसच्या पाच ते सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं. त्यावरून कॉंग्रेस या आमदारांवर कारवाई करत विधानसभेचं तिकीट कापणार, अशा देखील चर्चा सुरू होत्या. त्यामुळे आता हे आमदार कॉंग्रेसची साथ सोडून शिंदे गटात जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com