Maharashtra Politics : 'सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं चूक... बहिणीविरोधात उमेदवारी द्यायला नको होती'; चूक झाल्याची अजितदादांची कबुली

Ajit Pawar On Sunetra Pawar : लोकसभा निवडणुकीत बारातमीतून बहीण सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवणं मोठी चूक होती, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीररित्या दिलीय.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

आता बातमी अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्याची..लोकसभा निवडणुकीत बारातमीतून बहीण सुप्रिया सुळेविरोधात सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवणं मोठी चूक होती अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीररित्या दिलीय. राजरकारण हे पार घरात शिरू द्यायचं नसतं असंही अजित पवारांनी नमूद केलं. नेमकं अजित पवारांनी काय म्हटलंय आणि त्याला सुप्रिया सुळेंनी काय उत्तर दिलंय... त्यावरचा हा रिपोर्ट....

केलं तर केलं..नाही केलं तर नाही केलं..असा अजित पवारांचा बेधडक स्वभाव..अजितदादा हातचं राखून काही ठेवत नाहीत....त्याचाच आणखी एक अनुभव आलाय. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. हा पराभव अजितदादांनी स्वीकरला. मात्र तब्बल अडीच महिन्यांनंतर आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी या निवडणुकीबद्दल मोठी कबुली दिलीय. बहिणीविरोधात सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणं चूक होती अशी थेट जाहीर कबुलीच अजित पवारांनी जय महाराष्ट्रच्या मुलाखतीत दिलीय. एवढंच नव्हे तर राजकारण आणि कुटुंब वेगवेगळं ठेवायचं असंत असं सांगायलाही अजितदादा विसरले नाहीत. नेमकं काय म्हटले अजित पवार ते पाहूयात.....

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

सगळ्या बहिणी माझ्या लाडक्या आहेत.

राजकारण राजकारणाच्या ठिकाणी.

अनेक घरांमध्ये राजकारण चालतं

पण राजकारण हे पार घरात शिरू द्यायचं नसतं.

माझ्याकडून मात्र थोडीशी चूक झाली.

मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं.

मात्र त्यावेळेस पार्लमेंटरी बोर्डानं निर्णय घेतला.

परंतू एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही.

पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं.

Maharashtra Politics
Manoj Jarange Patil On Bhujbal : 'छगन भुजबळ नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती'; भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जरांगेंचा हल्लाबोल

अजित पवारांच्या या कबुलीवर सुप्रिया सुळेंनी मात्र विधान ऐकलं नसल्याचं सांगत प्रतिक्रिया देणं टाळलंय. महायुतीतल्या मित्र पक्षांनी मात्र अजितदादांच्या कौतुक केलंय. जशा सुप्रिया सुळे 15 वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत तसेच दादाही गेल्या तीन दशकांपासून बारामतीचे आमदार आहेत. मात्र लोकसभेसारखाचं विधानसभेतही बारामतीत पवार विरूद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता आहे. आणि ही शक्यता टाळण्यासाठी अजित पवारांनी कबुली देऊन शरद पवारांसमोर घरातला उमेदवार देण्याबाबत पेच वाढवलाय की काय अशी चर्चा रंलगलीय.

Maharashtra Politics
Kolhapur Crime News : कोल्हापुरातील उद्योजकाच्या घरात रात्री घडला थरार; अख्ख कुटुंब दहशतीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com