

सोलापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड
विधानपरिषद निवडणुकीपूर्वी भाजपकडून शिंदेंना धक्का
मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी हाती घेतलं कमळ
सोलापुरमध्ये बबनराव आवताडे गटाने भाजपमध्ये पक्षप्रवेश केला
मंगळवेढ्यात ५ नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला
भाजपकडून राज्यभर ऑपरेशन लोटस सुरूच आहे. भाजपने मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदेगटाला मोठा धक्का दिला. भाजपने शिंदेंसेनेच्या बड्या नेत्याला फोडलं. शिंदेसेनेच्या बड्या नेत्यासह ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या सर्वांनी कमळ हाती घेतलं. या पक्षप्रवेशामुळे सोलापूरमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे.
सोलापुरात भाजपने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला. मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्यासह ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, डीसीसीचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्यासह २०० पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेतलं.
मंगळवेढा शहरासह ग्रामिणचे १० सरपंच, ४० ग्रामपंचायत सदस्य, बाजार समिती सभापतीसह १७ संचालक, खरेदी विक्री संघाचे १५ सदस्य, ७० सोसायटी सदस्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. नगरपरिषदेला बबनराव आवताडे गटाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. मात्र आता ऐन डीसीसी बँक आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी सांगितले की, 'मंगळवेढ्याच्या विकासाची कामं हे आमचे मुख्य ध्येय आहे. मंगळवेढ्याचा विकास होणं गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ आम्हाला असेल. आमच्या मंगळवेढ्याचा विकास होईल अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही मंगळवेढा हद्दवाढीचा प्रस्ताव करणार आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.