Beed News : बीड नगरपरिषदेला खुद्द जिल्हा न्यायाधीशाचे पत्र; पत्रातून तक्रार मांडून केली पोलखोल

Beed News : बीड नगरपरिषदेचा पाणीपुरवठा विभागातील गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
Beed Nagar Parishad
Beed Nagar ParishadSaam tv
Published On

बीड : बीड नगरपरिषदेचा पाणीपुरवठा विभागातील गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. बीडच्या (Beed) जिल्हा न्यायाधीशांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून पाणी पुरवठ्याबाबत तक्रार मांडली आहे. या पत्राद्वारे नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची पोलखोल केली आहे. (Live Marathi News)

Beed Nagar Parishad
Gadchiroli News : नक्षलवाद्यांचा भारत बंद; छत्तीसगडमध्ये दोन प्रवासी बस पेटवल्या

जिल्हा न्यायाधीशांनी (Court Judge) नगरपरिषदेला लिहिलेल्या पत्रात जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. तसेच टॅंकरने पाणी पुरवठा (Water Crisis) करायला सांगूनही नगरपालिका तसा पुरवठा करीत नाही. त्यामूळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे पत्रात नमूद आहे. यामुळें पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे, असं म्हणणाऱ्या नगरपालिका प्रशासनाची पोलखोल खुद्द न्यायालयानेच केली आहे..त्यामुळं जर न्यायालयालाचं वेळेवर पाणी मिळत नसेल तर सामान्य नागरिकाचे काय हाल असतील ?

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Nagar Parishad
Organic Papaya Farming: उच्चशिक्षित शेतकऱ्याची सेंद्रिय पद्धतीने पपईची शेती; रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारले गोमूत्र

शासकीय कार्यालयातही पाण्याची समस्या 
दरम्यान बीड शहरवासीयांना पाण्यासाठी रोज पैसे मोजावे लागत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत यासह सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद आदी इमारतींमध्ये पाण्याची अवस्था भीषण आहे. ठिकठिकाणी नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com