Maharashtra Politics: पुन्हा राजकीय भूकंप? नाराज शिंदे गट ठाकरेंकडे परतणार? शंभूराज देसाईंचे सर्वात मोठे विधान

उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाण्याबद्दल शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे..
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaamtv
Published On: 

Maharashtra Political Crisis News: राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार गेल्या वर्षीच्या जून महिन्यात सत्तेवर आले. आता या सरकारला आणखी एकाची साथ मिळाली आहे. अजित पवारांवर टीका करूनच एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते.

आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात संधी दिल्याने शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याबद्दलची आता सर्वात महत्वाची बातमी समोर येत असून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाण्याबद्दल एक मोठे विधान केले आहे. (Maharashtra Politics News)

Maharashtra Politics
Ratan Tata Viral Tweet: माणूसकीचं आवाहन! द ग्रेट रतन टाटांच्या एका ट्वीटने ह्रदय जिंकलं; वाचून तुम्हीही व्हाल भावुक

शिंदे गट नाराज...

याबाबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर बंडखोर नेत्यांनी पक्ष संपत असल्याचं विधान केलं होते. अजित पवार निधी देत नव्हते, ते पक्ष संपवत होते आणि राष्ट्रवादी वाढवत होते, असा ठपका ठेवण्यात आलेला होता.

त्यानंतर आता थेट अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी पक्ष सत्तेत भागीदार झाल्याने शिंदे गट नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत आता शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे.

Maharashtra Politics
Dhule Container Accident: धुळे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

काय म्हणाले शंभूराज देसाई...

शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना "आता परत उद्धव ठाकरे यांनी हाक दिली, आम्ही एकत्र येतो करून तर तुम्ही मान्य करणार का? असा प्रश्न त्यांन विचारण्यात आला.

त्यावर बोलताना "हा जर तर हा पुढचा विषय आहे. ज्यावेळी हाक येईल तेव्हा साद दिली जाईल असे म्हणत त्यांच्याकडून तशी साद आली तर सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ." असे मोठे विधान केले आहे. शंभुराज देसाई यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.