
नारळी पोर्णिमेच्या निमित्तानं शुक्रवारी वरळी कोळीवाड्याचा राजकिय आखाडा झाला.. मुंबईच्या किनाऱ्यावर दोन कट्टर राजकिय विरोधक आमनेसामने आल्यानंतर नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.
नारळी पोर्णिमेत राजकीय राडा; कोळीवाड्यात ठाकरे शिंदेंमध्ये टशन
नारळी पोर्णिमा, कोळीबांधवांचा हा प्रमुख सण प्रत्येक कोळीवाड्यात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. तसा काल वरळी कोळीवाड्यात देखिल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. परंतू याच सणाला काल राजकीय दुष्मनीनं गालबोट लागलंय. राज्यात शिंदे आणि ठाकरे एकत्र आले आणि बातमी झाली नाही तर नवलच. आणि अगदी तसंच झालं. दोन्ही नेते आमनेसामने आल्यानं कार्यकर्त्याच्या उत्साहाला उधाण आलं.
दोन्ही शिवसैनिकांनी दिलेल्या जोरदार घोषणाबाजीनं कोळीवाडा दणाणून गेला. आणि चिघळलेली परिस्थिती पाहता चिंचोळ्या गल्लीत आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना देत एकनाथ शिंदेंकडे नजर रोखून धरली. आदित्य ठाकरेंच्या या करड्या कटाक्षानं पोलिस ही अलर्ट झाले.
वरळीत आदित्य ठाकरेंसाठी छातीचा कोट करुन उभे असलेले सुनिल शिंदेच्या मुलावर झालेल्या या आरोपांनंतर मात्र खळबळ माजली. तापलेल्या राजकीय वातावरणात ज्या महिलेनं हल्ल्याचा आरोप केलाय ती महिला सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेतेय. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केलीये. तर यावर घटनेनंतर आमदार आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूया..
आदित्य ठाकरे वरळीतून आमदार झाल्यानंतर राजकीय वर्तुळात वरळी कोळीवाडा हा प्राईम स्पॉट बनला. ठाकरेंना अस्वस्थ करण्यासाठी प्रत्येक पक्षानं आपली नजर कोळीवाड्याकडे वळवलीये. परंतू या राजकीय स्पर्धेत कोळी बांधवांच्या सणाला राजकिय स्पर्धांमुळे काळीमा फासला जातोय. समुद्राला शांत करण्यासाठी समुद्रात नारळ सोडून नारळी पोर्णिमा साजरी केली जाते पण काल मुंबईच्या किनाऱ्यावरच शिंदे आणि ठाकरेंमध्ये फुटलेला वादाचा नारळ आणखी किती कार्यकर्त्यांची डोकी फोडून शांत होतो हे येत्या काळात कळेलच.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.