Maharashtra Politics : शिंदेसेनेच्या महिला शाखाप्रमुखाची तक्रार, ठाकरे गटातील आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल

Maharashtra Political News : ठाकरे गटातील आमदार सुनील शिंदे यांचे पुत्र सिद्धेश शिंदे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटातील महिला शाखाप्रमुखाच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली आहे.
Aditya Thackeray Eknath Shine Worli
Aditya Thackeray Eknath Shine Worlisaam tv
Published On
Summary
  • ठाकरेसेनेतील आमदाराच्या मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल

  • शिंदे गटातील महिला शाखाप्रमुखाच्या तक्रारीनंतर कारवाई

  • नारळीपौर्णिमेदरम्यान वरळीत गोंधळात धक्काबुक्की केल्याचा आरोप

Worli : नारळीपौर्णिमेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच वेळी वरळीमध्ये दाखल झाले. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात गेलेल्या एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. याला शिंदे गटानेही प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली.

वरळीमधील काल झालेल्या गोंधळानंतर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, आमदार सुनील शिंदे यांचे सुपुत्र सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नारळीपौर्णिमेच्या गोंधळात शिंदे गटातील महिला शाखाप्रमुखाला धक्का मारल्याचा शिंदे यांच्यावर आरोप आहे. शिंदे गटातील एका महिला शाखाप्रमुखाने सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी सिद्धेश शिंदे यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

Aditya Thackeray Eknath Shine Worli
Politics : शरद पवार सत्तेत येतील, नरेंद्र मोदींना साथ देतील; सत्ताधारी आमदाराचा दावा

दादर पोलीस ठाण्यामध्ये युवासेना सदस्य सिद्धेश शिंदे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ११५ (२) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार करणारी महिला शाखाप्रमुखा केईएम रुग्णालयात उपचार घेत असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धेश शिंदे यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

Aditya Thackeray Eknath Shine Worli
Shocking : रक्षाबंधनासाठी गावी आला, शेतात फिट आली अन् नाल्यात कोसळला; तरुण इंजिनिअरचा मृत्यू

'ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आमच्या विरुद्ध गद्दार अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. गर्दीत माझ्या पाठीमध्ये कुणीतरी मारलं. मागे वळून पाहिल्यावर मला मारणारी व्यक्ती सिद्धेश शिंदे होता. नंतर त्याने मला एक बुक्का मारला, काय सुरु आहे ते मला समजत नव्हते', अशी माहिती महिला शाखाप्रमुखाने दिली आहे. या एकूण प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'रडीचा डाव सुरु आहे. सत्तेचा वापर करुन कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत', असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Aditya Thackeray Eknath Shine Worli
Pune Crime : पुण्यात महिलेनं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com