
पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
पुण्यातील फुरसुंगी परिसरातील घटना, पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल
गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पीडितेच्या वडिलांनी दिली फिर्याद
सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी
Pune : पुण्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सासरी होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात ही घटना घडली आहे. पती कोणताही काम धंदा न करता घरात बसून असतो मुलांसाठी बचत गटामार्फत काम करत असतानाही सासरी होणार्या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. फुरसुंगी पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सीमा अक्षय राखपसरे (वय २४, रा. चंदवाडी, स्मशानभूमीजवळ, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचे वडील रवी खलसे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती अक्षय सुरेश राखपसरे, चुलत सासरे वसंत राखपसरे, सासु आशाबाई सुरेश राखपसरे, दीर अविनाश सुरेश राखपसरे, जाऊ पुला अविनाश राखपसरे (सर्व रा. फुरसुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरात ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवी खलेस यांची लेक सीमाचे अक्षय राखपसरे याच्यासह ६ जुलै २०२० रोजी लग्न झाले होते. अक्षयचे सर्व्हिस सेंटर असल्याचे लग्नाच्या वेळी सांगण्यात आले होते. तेव्हा त्यांनी ५० हजार रुपये दिले होते. सीमा आणि अक्षय यांना तीन वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षांची मुलगी आहे.अक्षय हा काही कामधंदा करत नसल्यामुळे तिचा व तिच्या मुलांचा खर्च तिचे वडिल खलसे हे करत होते. अक्षय राखपसरे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने सीमा हि घरातील वाद त्यांना सांगत नसे. तिच्या घराचा पूर्ण कारभार तिचे चुलत सासरे वसंत राखपसरे हे पाहत होते. किरकोळ कारणावरुन अक्षय सीमा हिला मारहाण करत असे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागणार आहे. कोठेतरी नोकरी शोधा, असे ती म्हणत असे. त्यावरुन तिचे व तिच्या सासरच्या लोकांशी सतत वाद व्हायचे.
सीमाला तिचा पती वारंवार मारहाण करत असे. तिची मोठी जाऊ पूजा ही सासूची सख्खी भाची असल्याने ती सतत सीमाबद्दल चुगल्या करीत असे. सीमाने बचत गट सुरू करून किराणा दुकान चालू केले होते. तिच्या व मुलांच्या कपड्यांसाठी व इतर खर्चासाठीचे पैसे तिचे वडील पाठवत असत. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादींना मुलीच्या चुलत दिराच्या मोबाईलवरून फोन आला. त्यामध्ये सांगण्यात आले की, मुलीच्या दशक्रिया विधीस सीमेला जाता आले नाही, त्यामुळे तिने फाशी घेतली. ही माहिती मिळताच ते तातडीने पुण्यात आले. मात्र, त्यांना मुलगी ठीक असून भेटायची गरज नाही असे सांगण्यात आले व भेटण्यास नकार देण्यात आला. डॉक्टरांनी सीमाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून, सीमाने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब खंदारे करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.