
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
निवडणुकीपूर्वी दोघांनी १६० जागांची गॅरंदी दिली असे ते म्हणाले.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Politics : शरद पवार यांनी नागपूरमध्ये मोठा गौप्यस्फोट केला. दोन माणसं विधानसभा निवडणुकीच्या आधी भेटायली आली होती. त्यांनी १६० जागा जिंकवून देतो अशी गॅरेंटी दिली होती. त्या दोघांची राहुल गांधींसोबत भेट घालून दिली होती. तेव्हा आपण यात पडायला नको असं आम्ही ठरवलं, असे शरद पवार म्हणाले. नुकतंच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले. यानंतर लगेचच शरद पवारांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राहुल गांधींना भेटल्यानंतर इतक्या दिवसांनी शरद पवार यांना याची आठवण कशी झाली? मला हे समजत नाही. राहुल गांधी सलीम-जावेद यांच्यासारख्या कहाण्या तयार करुन सांगत आहेत. त्यांच्या स्क्रिपवर राहुल रोज नवीन कल्पित कहाण्या सांगत आहेत. राहुल गांधींसारखी अवस्था शरद पवारांची तर झाली नाही ना?' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'राहुल गांधी ईव्हीएवर बोलत होते. ईव्हीएमला दोष देणे अयोग्य आहे अशी भूमिका अनेकदा शरद पवारांनी घेतली होती. आणि ते आता असं बोलत आहेत. त्यांच्यावर राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसत आहे. कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करा. पण भारताएवढी फ्री अँड फेयर निवडणुका कुठेही होत नाही', असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.
महाविकास आघाडीवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'हे सर्वजण बोलत आहेत. पण निवडणूक आयोगाने बोलावले तर कोणीही जात नाही. आयोगासमोर शपथपत्र द्यायला तयार नाही आणि सांगत आहेत की आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. संसदेतील शपथ सुप्रीम कोर्टात सांगत असेल आणि ते म्हणत असेल, तर आम्ही संस्थेची शपथ घेतली हे त्यांना चालेल का? शपथपत्र मागितले असून तुम्ही का देत नाही, तुम्ही खोटं बोलत आहात. तुमचं खोटं पकडलं गेलं तर तुमच्यावर उद्या कारवाई होऊ शकते. रोज खोटं बोलायचं आणि पळपुट्या सारखं पळून जायचं हे त्यांचं काम आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.