Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Political News : काँग्रेसचे नेते अभय पाटील हे पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यांनी शिंदेसेनेत येण्यात ऑफर देण्यात आली आहे. पाटील लवकरच शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicssaam tv
Published On
Summary
  • डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

  • काँग्रेसमध्ये अभय पाटील नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

  • त्यांना शिंदे गटाने शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

  • अभय पाटील लवकरच शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Maharashtra : अकोला जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते अभय पाटील यांनी पक्षातील सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा दिली होती. यामुळे अकोल्यात काँग्रेसला धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने अभय पाटील यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. यामुळे काँग्रेसपाठोपाठ भाजपला धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे.

डॉ. अभय पाटील हे अकोला जिल्ह्यातील मोठे नेते आहे. राजकारणाव्यतिरिक्त ते इतर क्षेत्रातही सक्रीय आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेसने अभय पाटील यांना संधी दिली होती. तेव्हा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर उमेदवार म्हणून उभे राहिल्याने मत विभाजन होऊन अभय पाटील यांचा पराभव झाला. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे अनुप धोत्रे विजयी झाले होते. जर आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले नसते, तर अभय पाटील यांनी अनुप धोत्रे यांना पराभूत केले असते, असे म्हटले गेले होते.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

काँग्रेसमध्ये अभय पाटील यांना मानाचे स्थान मिळेल असे सर्वांना वाटले होते. पण कार्यकारिणीमध्ये त्यांचा समावेश केला गेला नाही. यामुळे ते नाराज होते पण त्याची समजूत कोणी काढली नाही किंवा नाराजीचे कारण विचारले नाही. यामुळे त्यांनी सोशल मीडियाद्वारे काँग्रेस पक्षातील पदाचासह काँग्रेस सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

Maharashtra Politics
Kalyan : कल्याणमध्ये मराठी-अमराठी वाद! परप्रांतीय हॉटेलचालकाचे मराठी माणसांबद्दल अपशब्द, मनसैनिकांनी काय केलं पाहा; VIDEO

काँग्रेसच्या या नाराज नेत्याचे महत्त्व शिंदेंच्या शिवसेनेने ओळखले आहे. शिंदेसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी स्वत:हून पुढाकार घेत अभय पाटील यांच्याशी थेट संपर्क केल्याचे म्हटले जात आहे. फोनद्वारे संपर्क साधून शिवसेना पक्षात सामील होण्याची ऑफर अभय पाटील यांना देण्यात आली आहे. यावर पाटील यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो असे म्हटले जात आहे. असे झाल्यास अकोल्यामध्ये काँग्रेससह भाजपला धक्का बसेल.

Maharashtra Politics
Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com