
शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या गौप्यस्फोटावर भाजप आमदाराने प्रतिक्रिया दिली.
शरद पवार लवकरत सरकारमध्ये सामील होतील, असे वक्तव्य आमदाराने केले आहे.
भाजप आमदाराच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
Sharad Pawar Narendra Modi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये दोनजण भेटण्यासाठी आले होते, २८८ पैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी ते देत होते असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. दोघांनी मला आणि राहुल गांधींना ही ऑफर दिली होती. पण निवडणूक आयोगवर विश्वास ठेवत याकडे दुर्लक्ष दिले, असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे. यावर भाजप आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत, त्यांनी अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिले आहेत. हताश झालेले राहुल गांधी उठसूट सरकारवर आरोप करतात. कुठलाही विषय नसताना बाऊ बनवतात. शरद पवार स्वतः विद्वान आहे, बुद्धिजीवी आहेत, सक्षम आहेत. त्यांनी तरी असं वक्तव्य करु नये. हताश झाल्याने, निराधार झाल्याने लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान करणे योग्य नाही', असे रवी राणा म्हणाले आहेत.
भाजप आमदार रवी राणा म्हणाले, 'भाजपला वारंवार कौल मिळत आहे. महाराष्ट्र आणि देशातील जनता भाजपला साथ देत आहे. काँग्रेसने फक्त आतापर्यंत राजकारण केले आहे. निराश होऊन शरद पवारांनी असं कुठलंही वक्तव्य करु नये. येणाऱ्या काळात शरद पवार नरेंद्र मोदींना केंद्रामध्ये साथ देतील, सरकारमध्ये सामील होतील. मोदी यांच्या नेतृत्त्वाला ते मान्य करतील.'
सुप्रिया सुळे नरेंद्र मोदी यांना अनेकदा भेटल्या आहेत. अनेकजण लोकसभा अधिवेशन सुरु असताना मोदींना भेटत आहेत. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह, नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कुठलीही नाराजी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे एकनाथ शिंदे यांच्यामागे पूर्ण ताकदीने उभे आहेत. शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा आहेत. कुठलेच मतभेद नसून फक्त मतभेद पसरवण्याचे काम विरोधकांकडून सुरु आहे, असे वक्तव्य रवी राणा यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.