Maharashtra Politics : मतचोरीविरोधात गांधी-आंबेडकर साथ साथ, निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात लढा

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील मतचोरी प्रकरणावर राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा मिळाला असून, न्यायालयीन लढाईत एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
maharashtra Politics
Political News Saam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १ कोटी बोगस मतदारांचे आरोप

  • राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर कठोर टीका केली

  • प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना एकत्र येण्याचं आवाहन केलं

  • ७६ लाख मतांचे संशयास्पद मतदान उघड झाल्याने निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रातील मतचोरीच्या मुद्द्यावरुन आक्रमक होत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १ कोटी बोगस मतदार आढळून आल्याचे पुरावे सादर करत राहुल गांधीनी निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यात प्रकाश आंबेडकरांनी उडी घेतली आहे. तर राहुल गांधींच्या भूमिकेचं स्वागत करत प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना न्यायलयीन लढाईत साथ देण्याचं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुकीत सायं. ६ नंतर तब्बल ७६ लाख मतदारांनी मतदान केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. तर प्रकाश आंबेडकरांनी उच्च न्यायालयात निवडणुकीतील वाढलेल्या मतदानासंदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यानंतर आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

maharashtra Politics
Maharashtra Politics : दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राचा दबदबा; उद्धव-राहुल भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणांची चिन्हे

१९३१ च्या पुणे करारावेळी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले होते. तर पंडित नेहरु आणि बाबासाहेब आंबेडकरांचंही संविधान सभेत अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचं चित्र होतं. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांनी लोकशाही वाचवण्यासाठी पंडित नेहरुंचे वारसदार राहुल गांधींनी सोबत येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे राहुल गांधी प्रकाश आंबेडकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मतचोरी विरोधात एकत्र येणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com